जिवती - 3 महिन्याचा पगार का काढला नाही म्हणून जिवती नगरपंचायत मधील मुख्याधिकारी कविता गायकवाड यांनी लेखापाल सागर कुऱ्हाडे यांच्यावर संताप व्यक्त करीत त्यांच्या टेबलावरील laptop लॅपटॉप फेकला. Virul video
सदर हमरीतुमरी चा हा व्हिडीओ समाजमाध्यमात चांगलाच व्हायरल झाल्याने चंद्रपूर जिल्हा प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे.
Free style
महिला मुख्याधिकारी पगाराचा चेक का काढला नाही ? अशी विचारणा करत रोखपालाच्या समोर आदळआपट करतांना दिसत आहेत. टेबलावरील वस्तु फेकत आहेत. मुख्याधिकारी आणि रोखपाल दोघांनी एकमेकांची लायकी काढली आहे. हा विडीओ social media समाजमाध्यमात व्हायरल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान रोखपाल सागर कुर्हाडे यांनी जिवती पोलीसात तक्रार नोंदविली आहे तर मुख्यधिकारी कविता गायकवाड यांनी जिल्हाधिका-यांकडे याची तक्रार केली आहे.
