चंद्रपूर - विदर्भात मनसेची खरी ताकद म्हणून अतुल वांदिले यांचं नाव नेहमी पुढं येत मात्र आता मनसेची ही ताकद राष्ट्रवादी कांग्रेसच्या वाटेवर असून यामुळे विदर्भात मनसेला मोठा धक्का बसणार आहे.
Mns atul wandile
अतुल वांदिले यांनी हिंगणघाट विधानसभा सुद्धा लढली असून त्यांनी प्रस्थापित नेत्यांना चांगली टक्कर दिली होती, मात्र वाऱ्याची दिशा ज्याप्रमाणे बदलते त्याप्रमाणे नेत्याचं राजकारण व पक्ष सुद्धा बदलत असतो. Join Ncp
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल वांदिले यांनी 40 मनसे पदाधिकाऱ्यासह राष्ट्रवादी कांग्रेस मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती काही प्रसार माध्यमांद्वारे पुढे आली आहे.
अतुल वांदिले यांच्या राष्ट्रवादी कांग्रेस प्रवेशाने भविष्यात मनसेला विदर्भात मोठा धक्का मिळणार? आहे.
