चंद्रपूर - चंद्रपूर महानगरातील बाबूपेठ प्रभागामध्ये मागील काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांची संख्या अचानक वाढली असून लहान मुलांवरती तसेच दुचाकी वाहनावर्ती हे मोकाट कुत्रे हल्ले करत आहे ,
बाबुपेठ मधील लुंबिनी नगर, माता मंदिर चौक, तुकाराम चौक, विकतू बाबा मंदिर परिसर, आंबेडकर नगर, छत्रपती चौक अश्या अनेक वॉर्डांत मोकाट कुत्र्यांनी धमाकुळ माजवला आहे अशी तक्रार आम आदमी पक्षाकडे प्राप्त झाली, पक्षाने याची दखल घेत अचानक कुत्र्यांची संख्या आपल्या प्रभागात का वाढत असल्याचे शोध घेतले असल्यास धक्कादायक बाब समोर आली, त्यामध्ये महानगरपालिकेतील कर्मचारी शहरातील मोकाट कुत्रे पकडून सदर बाबुपेठ परिसरात आणून सोडत असल्याचे धक्कादायक बाब समोर आली. Unwary dogs
मनपाच्या या घृणास्पद कार्याबाबत आप चे शहर सचिव राजू कूडे यांच्या नेतृत्वात मनपाचे आयुक्त यांची भेट घेण्यात आली असून संतप्त आपचे सचिव राजू कुळे यांनी मनपा आयुक्तांना लवकरात लवकर मोकाट कुत्र्याची व्यवस्था करा अन्यथा मोकाट कुत्री मनपात सोडू असा इशारा देण्यात आला. यावेळेला आप चे शहर सचिव राजू कुडे, बाबा नगर चे शाखा अध्यक्ष सागर बोबडे, माहेर घर चौक चे शाखा अध्यक्ष विशाल रामगीरवार, दिपक चूनारकर, कालिदास ओरके, दिपक निपाने, अशोक आंबटकर, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. Aam Aadmi party