चंद्रपूर - ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडलेल्या नगरपंचायत निवडणुकीचा निकाल 19 जानेवारीला घोषित करण्यात आला.
यामध्ये माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या नेतृत्वात भाजप फक्त एकाच नगरपंचायतीवर स्पष्ट बहुमत प्राप्त करू शकले.
राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपले नेतृत्व सिद्ध करीत 4 नगरपंचायतीवर स्पष्ट बहुमत मिळविले.
सोबत राष्ट्रवादी कांग्रेसने सुद्धा आपली जादू दाखवीत जिवती येथे 6 जागेवर विजय मिळविला.
महाविकास आघाडी मधील अति महत्वाचा घटक म्हणजे शिवसेना, जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढविण्यात आली, जिल्ह्यातील पोम्भूर्णा व गोंडपीपरी नगरपंचायत मिळून 6 जागेवर विजय मिळविला.
कांग्रेसतर्फे पालकमंत्री वडेट्टीवार व खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. भाजपतर्फे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, माजी आमदार अतुल देशकर व भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे निवडणुकीत प्रचाराची धुरा सांभाळून होते.
राष्ट्रवादी कांग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैध यांनी निवडणुकीची संपूर्ण धुरा हाती घेतली, वंचित बहुजन आघाडीने ही आपली ताकद या निवडणुकीत पणाला लावली मात्र दिग्गजांच्या गर्दीत शिवसेना एकटी उभी होती. Shivsena
जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे हे गडचांदूर नगरपरिषदेचा अनुभव हाती घेत निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारांच्या सोबत होते, प्रचारात सम्पर्क प्रमुख व युवकांची फौज सोबतीला आली.
जिल्हाप्रमुख गिर्हे यांनी पोम्भूर्णा येथे तळ ठोकत संपूर्ण तालुक्यात लक्ष ठेवले. Mahavikas aghadi
प्रचार सुरू झाले, नेते मंत्री प्रचारात आले, राज्यात मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा असताना सुद्धा गिर्हे यांनी निवडणुकीत एकाकी लढा दिला.
पोम्भूर्णा, गोंडपीपरी, जिवती, कोरपना, सावली, सिंदेवाही-लोणवाही या नगरपंचायतीसाठी प्रचार सुरू झाला.
मतदान पार पडले, निकालाचा दिवस उजाडला, शून्यावरून सुरुवात करीत पोम्भूर्णा नागरपंचायतीत 4 जागेवर तर गोंडपीपरी येथे 2 जागेवर शिवसेनेने विजय मिळविला. Nagar panchayat election result
कोरपना येथे सर्व पक्ष कांग्रेस विरोधात एकत्र येत निवडणूक लढले मात्र कांग्रेसने सर्वाना धोबी पछाड देत स्पष्ट बहुमत प्राप्त केले.
जिवती, गोंडपीपरी, पोम्भूर्णा व कोरपना तालुक्यात निम्म्या मतांनी शिवसेनेचा पराभव झाला.
जिल्ह्यात नगरपंचायतच्या 102 जागेपैकी 53 जागा जिंकत कांग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला तर भाजपने 24 जागा जिंकत दुसऱ्या जागेवर मजल मारली, राष्ट्रवादी कांग्रेस 8 जागा जिंकत तिसऱ्या स्थानावर तर शिवसेना 6 जागा जिंकत चौथ्या स्थानावर गोंगपा 5 तर वंचित ने 2 जागा जिंकल्या.
निवडणूक जिंकायला अनेक मोठ्या नेत्यांनी प्रचार केला मात्र एक शिवसैनिक म्हणून स्वतः गिर्हे यांनी युवकांचे सैन्य प्रचाराला लावले.
विजय मिळणार की पराभव हाती येणार याची चिंता न करता संपूर्ण ताकद पणाला लावली.
अनेक ठिकाणी शिवसेना शून्यावर आली मात्र हा नवा अनुभव हाती घेत निवडणुकीच्या मैदानात पुन्हा उभे राहून आम्ही बॅटिंग करीत चांगला स्ट्राईक रेंट देण्याचा प्रयत्न करणार असे उद्गार शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी काढले.
राज्य व केंद्र सरकारमध्ये मंत्रिपद भूषविलेल्या समोर नवख्या तरुणाने निवडणुकीत चांगलीच मजल मारीत नव्या नेतृत्वाची चाहूल सिद्ध करून दाखविली.