चंद्रपूर - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत केंद्र व राज्य सरकारने अनेक निर्बंध लावले.
कोरोना विषाणूनंतर डेल्टा, डेल्टा प्लस, व आता ओमायक्रोन या व्हायरस ने उद्रेक माजविला आहे.
सध्या राज्यात अनेक पर्यटन क्षेत्र ही बंद आहे, चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिध्द ताडोबा सुद्धा काही दिवसांपासून कोरोना निर्बंधांमुळे बंद आहे. Tadoba tiger project
चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या सितारामपेठ परिसरात मद्यपींचा गोंधळ बघायला मिळाला आहे. 28 जानेवारीला दुपारी सितारामपेठ येथील तलावातील वनविभागाच्या बोटी मध्ये बसून 5 युवक दारू पीत होते. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी गेले आणि त्यांनी युवकांना मनाई केली. मात्र मनाई केल्यावर त्यापैकी एकाने वनविभागाचे कर्मचारी सुरेंद्र मंगाम यांना धक्काबुक्की आणि शिविगाळ केली. भद्रावती पोलिसांनी या प्रकरणी आरोपी मोहम्मद अली अन्सारी (20) याला अटक केली आहे. आरोपी चंद्रपूर शहरातील तुकुम परिसरातील रहिवासी असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
