मूल - (गुरु गुरनुले )
घनदाट जंगलातून वाहतुकी योग्य नसलेल्या जंगल मार्गाने संध्याकाळच्या सुमारास स्वगांवाकडे परत जात असतांना वाघाच्या हल्यात एका युवकाचा बळी गेला. प्रथम दर्शनी वनविभागाने वाघाच्या हल्याची नोंद घेतली. परंतू तपासाअंती युवकाचा मृत्यु संशयास्पद वाटल्याने सदर प्रकरण आता वेगळेच वळण घेवु लागले आहे. काही मंडळीच्या हस्तक्षेपामूळे वनविभाग विरूध्द ग्रामस्थ असा वाद आता रंगु लागल्याने मृतकाचा परिवार मदतीपासून वंचित राहते की काय ? अशी शंका व्यक्त केल्या जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ३० डिसेंबर रोजी वनविभागाच्या बफर क्षेत्रातील डोणी येथील रूपेश नैताम, रणजीत सोयाम, भारत कोवे आणि आशिष नैताम हे चार जण चिरोली येथील राईस मिलवर धान दळण्याकरीता गेले. धान दळुन झाल्यानंतर संध्याकाळी ६.३० वाजताचे सुमारास दळलेले तांदुळ ट्र्ँक्टरने डोणी कडे रवाना करून चौघेही एकाच मोटार सायकलने चिरोली येथून फुलझरी मार्गे डोणी कडे जाण्यास निघाले. फुलझरी पासून डोणी कडे जाणारा मार्ग घनदाट जंगलातील वाहतुकी योग्य नाही. तरीसुध्दा डोणी आणि फुलझरी येथील ग्रामस्थ जवळचा मार्ग म्हणून बहुतांशी हयाच ६ कि.मी. लांब मार्गाचा वापर करतात. घटनेच्या दिवशीही डोणी येथील त्या चार युवकांनी स्वगांवाकडे जाण्यासाठी त्याच मार्गाची निवड केली. परंतु खडकाळ आणि जंगली मार्गाने अंधारात एका मोटार सायकलने चौघाना जाणे शक्य नाही म्हणून रणजीत सोयाम हा फुलझरी येथेच अरूण मरापे या नातेवाईकाकडे थांबला. त्यामूळे रूपेश नैताम, आशिष नैताम आणि भारत कोवे असे तिघेजन संध्याकाळी ७ वाजताचे सुमारास एका मोटार सायकलने डोणीकडे निघाले. दरम्यान मोटार सायकल अचानक बंद पडल्याने रूपेश, आशिष आणि भारत जंगलात थांबलेे. काही वेळानंतर अरूण मरापे आणि रणजीत सोयाम दुस-या मोटार सायकलने डोणी कडे निघाले असतांना मार्गात रूपेश, आशिष आणि भारत यांची भेट झाली. भेटी दरम्यान बंद झालेल्या मोटार सायकलवरून चौघांमध्यें शाब्दीक वाद झाल्याने रागाच्या भरात भारत कोवे हा घटनास्थळा वरून फुलझरी कडे परत येण्यास निघाला. मार्ग जंगली असून वाघाची भिती असल्याने सहका-यांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतू कोणाचेही न ऐकता भारत फुलझरी कडे निघाला असतांनाच वाघाने त्याचेवर हल्ला केला. वाघाच्या हल्यात भारत कोवे याचा दुदैवी मृत्यु झाला. दुसरे दिवशी ३१ डिसेंबर रोजी भारत कोवे हयाचा वाघाच्या हल्यात मृत्यु झाल्याची घटना उजेडात आली. वनरक्षकाकडून भारत कोवे याच्या मृत्युची माहिती झाल्यानंतर वरीष्ठ वनाधिका-यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतक भारत कोवे याच्या कुटुंबियास तातडीची आर्थिक मदत देवुन पुढील आर्थिक मदतीसाठी तपास सुरू केला. तपासाअंती घडलेला सर्व प्रकार शंकास्पद दिसून आला. ज्या घनदाट जंगलामधून दुचाकीस्वार डोणीकडे निघाले त्या जंगलात वाघाशिवाय इतरही वन्य प्राण्याचा मोठया प्रमाणांत वावर आहे. शिवाय ज्या मार्गाने दुचाकीस्वार डोणीकडे निघाले तो मार्गही वाहतुकी योग्य नाही. असे असतांना दुचाकीस्वारांनी गांवाकडे जाण्यासाठी राञौच्या वेळेस त्या मार्गाची निवड कशी काय केली ? असे अनेक प्रश्न वनाधिका-यांसमोर उभे राहीले. त्यामूळे त्यांनी सदर प्रकरणाचा वेगळया दिशेने तपास सुरू केला, तेव्हा घटनास्थळा पासून काही दूर अंतरावर काही आक्षेपार्ह वस्तु दिसुन आल्या. त्यामूळे प्रकरण नक्कीच वेगळे असावे. अशी शंका आल्याने वनाधिका-यांनी मृतक भारत कोवे सोबत त्यादिवशी त्यामार्गाने दुचाकीने जाणा-या दोघा जणांना अधिक माहीती जाणुन घेण्यासाठी ताब्यात घेतले. तपासाचा भाग म्हणुन त्यांना वन कार्यालयात आणुन प्रसाद देत सत्यता जाणुन घेण्याचा प्रयत्न केला. यात काय निष्पन्न होत आहे. हे वनाधिका-यांनाच माहीत. परंतु तपासाच्या नांवाखाली मध्यराञी गांवात येवुन बळजबरीने घरातुन उठवुन वन कार्यायलात नेणे व अपेक्षित वक्तव्य वदवुन घेण्यासाठी मारहाण करणे. वनाधिका-यांची ही कृती गैरकायदेशीर असल्याचा ठपका ठेवत डोणी व फुलझरी वासीयांमध्ये वनाधिका-यांविषयी रोष निर्माण झाला. मारहाण करणाऱ्या वनाधिका-याविरूध्द कारवाई झाली पाहीजे. या आग्रही मागणीच्या पुर्ततेसाठी ग्रामस्थानी काही राजकीय व अराजकीय संघटनांच्या प्रमुखांशी संपर्क साधला. न्यायाच्या अपेक्षेने ग्रामस्थ संपर्कात येताच काही संघटना ग्रामस्थांच्या बाजुने उभ्या राहील्या, संघटनेच्या प्रमुखांचे पाठबळ लाभताच अमानुष मारहाण केल्याचा ठपका ठेवत ग्रामस्थांनी वनाधिका-यांविरूध्द एल्गार पुकारला. मारहाण करणाऱ्या पाच वनाधिका-याविरूध्द मूल पोलीसातच नव्हे तर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांचे कडेही तक्रार नोंदविली. काही राजकीय मंडळीच्या नेतृत्वात मारहाण झालेल्या युवकांनी वनाधिका-याविरूध्द तक्रार नोंदविताच वनाधिका-यांनीही ग्रामस्थांना सहकार्य करणाऱ्या एका संघटनेच्या प्रमुखाविरूध्द शासकीय कामात अडथळा आणत असल्याचे कारणावरून तक्रार नोंदविली. सध्या ग्रामस्थ आणि वनाधिका-यांची एकमेकांविरूध्दच्या दोन्ही तक्रारी पोलीस स्टेशन मूल येथे कारवाईच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे आज ना उद्या पोलीसात गुन्ह्याची नोंद होईल. हे सर्वश्रृत असले तरी कोणाविरूध्द गुन्हा दाखल होईल. हे सध्यातरी न सांगता येणारे आहे.
भारत कोवेचा मृत्यु घटना स्थळी आढळलेल्या आक्षेपार्ह साहीत्यावरून वनाधिका-यांना शंकास्पद वाटत आहे. असे असले तरी त्याचे पश्चात त्याच्या कुटूंबाला नियमानुसार आर्थिक मदत मिळावी. या प्रयत्नात वन विभाग कागदपञांची जुळवा जुळव करत आहे. तरी सुध्दा काही मंडळी सदर घटनेत ग्रामस्थांच्या बळावर वनाधिका-यांविरूध्द कुंभाड रचत असल्याने वनाधिकारी काहीसे नाराज आहेत. एकमेकांवर अवलंबून असलेले ग्रामस्थ आणि वनाधिका-यां मधील नाराजी नाट्याचा परीणाम फुलझरी आणि डोणी परीसरात वनविभागा अंतर्गत रोजंदारीने काम करणाऱ्या युवकांच्या रोजगारावर झाला आहे. हीच नाराजी मृतक भारत कोवेच्या परीवारालाही भोवेल. अशी शंका आहे. ग्रामस्थ आणि वनाधिकारी यांचे वादात भारतचा परीवार आर्थिक मदतीपासुन वंचित राहु नये. तुर्त एवढीच अपेक्षा आहे.
वर्षाच्या शेवटी झालेला भारत कोवेचा मृत्यु वनविभागाला अनेक बाबतीत आव्हाण देणारा ठरणार आहे. वनजमिनीवरील अतिक्रमणाचा मुद्दा मृत्यु प्रकरणाने पुन्हा जोर धरणार असुन अनेकांचा रोजगार हिरावल्या जाण्याची शक्यता आहे.
ग्रामस्थ आणि वनाधिका-यांच्या वादात चर्चेत असलेल्या डोणी आणि फुलझरी या गांवासह घटनास्थळाला स्थानिक पञकारांनी भेट दिली. ग्रामस्थांशी साधलेल्या संवादात उपसरपंच विकास कुळमेथे आणि मारहाण झालेल्या आशिष नैताम यांनी अधिकार आणि कायद्याची पायमल्ली करून मारहाण करणाऱ्या वनाधिका-यांविरूध्द कारवाईची अपेक्षा व्यक्त केली तर वनपरिक्षेञ अधिकारी घनश्याम नायगमकर यांनी घटना शंकास्पद असल्याने चौकशी सुरू असल्याचे सांगितले. घटनास्थळाच्या पाहणी दरम्यान वन्यप्राण्यांच्या वावर असलेल्या घनदाट जंगलातुन वाहतुकी योग्य मार्ग नसलेल्या मार्गाने ग्रामस्थ राञौ बेराञौ ये-जा करतात कसे ? याबाबत आश्चर्य वाटले.
: वनाधिकाऱ्यांवर कारवाई करु नये तक्रार देणाऱ्या आशिष नैताम यांचे शपथ पत्र सादर फुलझरी डोनीच्या जंगलात ३०डिसेंम्बर रोजी भारत कोवे यांचेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली.सदर घटनेचा तपास करण्यासाठी त्याच दवशी रात्री वनविभागाच्या अधिकाऱ्याने आशिष नैताम व मनोज मरापे यांना जानाला येथील वनविभागाच्या कार्यालयात चौकशीसाठी आणले आणि दुसऱ्या दिवशी लेखी बयान घेऊन सकाळी त्यांना घरी सोडून दिले. असे असतांना डोनीच्या आशिष नैताम यांनी घटनेबाबत मुल पोलिसात मारहाण केल्याची तक्रार दाखल केली होती .परंतु दिलेली तक्रार मी गैरसमजुतीने केल्याचे आशिष नैताम यांनी लेखी शपथ पत्राद्वारे सांगितले. डोनी येथील भारत कोवे ,आशिष नैताम,रुपेश नैताम यांनी चारोली येथे राईस मिलवर धान दळण्यासाठी गेले होते. सायंकाळी धान दळल्यानंतर ३०डिसेंम्बर रोजी दुचाकीने गेले होते पिसाई झाल्यानंतर तांदूळ ट्रेकटरणी मुल-डोनी मार्गाने पाठवले. आणि भारत कोवे,आशिष नैताम,रुपेश नैताम,हे दुचाकीने फुलझरी मार्ग डोनिकडे जाण्यासाठी निघाले फुलझरी येथील नातेवाएक मनोज मरापे यांच्या घरी गेले आणि काही वेळ थांबून परत डोनीला निघाले परंतु मधेच जंगलात दुचाकी बंद पडली यातच त्यांच्यातच शाब्दिक बाचाबाची झाली त्यामुळे भारत कोवे हा रागाच्या भरात जंगलातून पळून गेला असता त्याचा शोध घेतला मात्र तो त्या दिवशी मिळाला नाही. दुसऱ्या दिवशी मात्र त्याला वाघाने ठार केल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी आशिष नैताम,मनोज मरापे, यांचे वनविभागाने बयान नोंदविले वाघाची दहशत असतांना रात्री घरी न सोडता सकाळी पोहचऊन कारवाई करेल या गैरसमजुतीने ३ जानेवारी रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम नायगमकर,वनरक्षक नागोबा ठाकरे, क्षेत्र सहाय्यक धुर्वे,निलेश बोरकर,यांनी मारहाण केली म्हणून मुल पोलीसात तक्रार दाखल केली ही तक्रार माझे गैरसमजुतीने करण्यात आल्याचे तक्रार कर्ते आशिष नैताम यांनी सांगून तसे शपथ पत्र सुद्धा २४ जानेवारी रोजी सादर केले. दाखल केलेल्या तक्रारीवरून कोणावरही कारवाई करण्यात येऊ नये असे शपथ पत्रात लिहून दिले आहे. एकंदरीत लांबलेल्या प्रकरनाला पूर्ण विराम मिळाले*.
