वरोरा - दिनांक 28 जानेवारी रोजी सकाळी 9.30च्या दरम्यान बोर्डा गावातील काही लहान मुले घराच्या मागे असलेल्या पायऱ्यांवर उभे राहुन पतंग उडवत असताना अचानक उच्च दाबाच्या ताराला पतंग अडकल्याने मोठा आवाज होत शॉर्ट सर्किट होऊन पतंग उडविणारा मुलगा आदित्य उमेश येटे 12 वर्ष हा गंभीरपणे भाजल्याची घटना घडली. त्यानंतर मुलाला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.प्राथमिक उपचार करून मुलाला तब्येत नाजूक असल्याने चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. Short circuit
शॉर्ट सर्किट झाल्याने आजूबाजुला असलेल्या दोन तीन घरचे मीटर जळाले आहेत.घटनास्थळी दाखल होत पोलीस पोलीस प्रशासन व महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जळालेल्या मीटर बदलवून देण्याचे काम सुरू आहे.
