चंद्रपूर - पूर्णतः औद्योगिकीकरण झालेला जिल्हा म्हणजेच चंद्रपूर, प्रदूषणात क्रमांक 1 वर सुद्धा चंद्रपूर जिल्हा प्रचलित आहे.
सदर प्रदूषणावर भर टाकण्याचे काम घुघुस-चंद्रपूर मार्गावर असलेल्या कोल डेपो ने केले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात वेकोलीच्या अनेक कोळसा खाणी असून त्यामधील चांगल्या कोळशाची उचल करीत सदर कोळसा वीज कंपन्यांना पुरविण्याचे काम केल्या जाते मात्र तसे काही होत नाही. Coal Depot
कोळसा पुरवठादार कोल डेपो वर चांगला कोळसा खुल्या बाजारात विक्री करीत निकृष्ठ दर्जाचा कोळसा वीज कंपन्यांना पाठवितात.
यामुळे वीज उत्पादन कंपन्यांना याचा सर्वात जास्त फटका बसतो मात्र फायदा कोळसा पुरवठादाराला होतो.
वर्ष 2014 ला National Green Arbitration Pune राष्ट्रीय हरित लवादा पुणे यांनी आदेश देत कोळसा पुरवठादार यांनी वेकोलीला हमीपत्र देत कोळसा थेट कंपन्यांना पुरविण्याचा निर्देश देत कोलडेपो मध्ये कोळसा खाली करणार नाही.
मात्र कोळसा पुरवठादार या नियमांचे सर्रास उल्लंघन करीत चांगला कोळसा कोलडेपोमध्ये उतरविण्याचे काम करीत आहे.
नागाळा या गावापासून तर थेट पडोली पर्यंत तब्बल 26 कोलडेपो असून यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषणात वाढ झाली आहे.
कोलडेपो बंद करावे या मागणीसाठी ग्राम वासीयांनी अनेक निवेदने प्रशासनाला दिली मात्र काहीही कारवाई झाली नाही. Shivsena sandip girhe
नागाळा येथील नागरिकांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांची भेट घेत भयावह प्रदूषणाचा प्रकार सांगत कोलडेपो बंद करण्याची मागणी केली.
जिल्हाप्रमुख गिर्हे, शिवसेना पदाधिकारी व गावकऱ्यांनी अवैध कोलडेपो बंद करावे यासाठी रस्ता रोको आंदोलन केले.
आंदोलनाची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण विभागाचे क्षेत्रीय अधिकारी करे यांनी आंदोलनस्थळी भेट देत 1 महिन्याचा आत सदर कोलडेपो वर कडक कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले.
शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी यावेळी सांगितले की कोलडेपो मुळे होणाऱ्या प्रदूषणाने नागरिकांच्या आरोग्यावर दिवसेंदिवस दुष्परिणाम होत आहे, कोलडेपो जवळ असणारी जिल्हा परिषद शाळेत धुळीचे वातावरण, शेत पिकांवर संपूर्णतः कोळश्याची काळी चादर ओढवलेली असते.
शाळेत असलेले विद्यार्थी ही आपली भावी पिढी आहे व आपला अन्नदाता या प्रदूषणाने त्रासलेला जर 1 महिन्यात सदर कोल डेपो बंद झाले नाही तर खुद्द शिवसेना आपल्या स्टाईलने हे सर्व कोलडेपो बंद करणार.
यासंदर्भात राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन पाठवीत कोलडेपो मुळे होणारे प्रदूषण बाबत सविस्तर माहिती कारवाई करावी याची मागणी रेटून धरणार.
आंदोलनावेळी शेकडो गावकाऱ्यांसह शिवसेना तालुका समन्वयक विकास विरुटकर, मनस्वीताई गिऱ्हे, महिला आघाडी तालुका संघटक उज्वलाताई नलके, नागाळा ग्रामपंचायत सरपंच रंजनताई कांबळे, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख निशाताई धोंगडे, युवासेना तालुका समन्वयक, सद्दाम कानोजे, तौसिफ खान, सुश्मित गौरकर सह आदी शिवसैनिक उपस्थित होते.