चंद्रपूर । कोविड- १९ मुळे हजारो लोकांचे रोजगार गेले, व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशा आर्थिक संकटात शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी मालमत्ता करावरील शास्ती माफ करावी, असे निर्देश स्थायी समिती सभापती संदीप आवारी यांनी मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांना दिले होते यासंदर्भात 7 जानेवारीला कोविडचे 2 डोज घेणाऱ्या नागरिकांसाठी पूर्णतः शास्ती कर माफ करण्यात आला आहे.
Property tax
३१ जानेवारी २०२२ पर्यंत कर भरणाऱ्यांना ही सवलत मिळणार असून स्थायी समिती सभापती संदीप आवारी यांच्या या निर्णयाने थकबाकीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Chandrapur municipal corporation
मागील २ वर्षात कोरोना विषाणूमुळे उदभवलेली परिस्थिती अत्यंत भयानक आहे. मागील वर्षी lockdown संचारबंदी लागल्याने अनेक नागरिकांचे रोजगाराचे साधन बंद झाले होते. अशा परिस्थितीत कर भरणे अनेकांना शक्य झाले नाही. अशा मालमत्ताधारकांना नवीन वर्षाची एक भेट म्हणून सभापती संदीप आवारी यांनी हा निर्णय घेत चंद्रपूरकरांना दिलासा देण्याचे काम केले आहे.