प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - शैक्षणिक क्रांतीच्या अग्रदूत जननी, ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांच्या नावाने नावारुपास आलेल्या मुल येथील क्रांती ज्योती नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. क्रांती सूर्य महात्मा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पतसंस्थेचे मुख्य सल्लागार चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रा.रामभाऊ महाडोळे,संस्थेचे संचालक तथा निवृत्त नायब तहसीलदार पुरुषोत्तम कोमलवार, संस्थेचे सल्लागार तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ. पद्माकर लेनगुरे, यांचे हस्ते प्रतिमेला मालार्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष गुरु गुरनुले, उपाध्यक्ष गुरुदास चौधरी, संचालक अशोक येरमे, संस्थेचे सदस्य व समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष प्रा.विजय लोनबले, ठेवीदार राकेश ठाकरे , व्यवस्थापक आर. टी. गुरनुले, रोखपाल भाऊजी लेनगुरे व कर्मचारी उपस्थित होते.