चंद्रपूर - शहरातील एकतर्फी प्रेमातून घडलेल्या चर्चित वनश्री आंबटकर या युवतीच्या हत्येला आज 4 महिने होत आहे मात्र या प्रकरणात पीडित मुलीला न्याय मिळाला नाही.
9 सप्टेंबर 2021 ला एका विवाहित युवकाने वनश्री वर चाकूने सपासप वार करीत हत्या केली, या घटनेचे पडसाद पूर्ण राज्यात उमटले, सदर घटनेनंतर आम आदमी पार्टी तर्फे प्रकरण लावून धरत बाबूपेठ भागात पोलीस चौकीची मागणी केली होती. Vanashree Ambatkar
पोलीस चौकीची मागणी पूर्ण झाली मात्र ती पोलीस चौकी महिन्यातून एकदा सुरू असते.
सदर प्रकरणानंतर आंबटकर यांच्या निवासस्थानी पालकमंत्री वडेट्टीवार, खासदार धानोरकर, आमदार सुधीर मुनगंटीवार व आमदार जोरगेवार यांनी हजेरी लावत स्वतातर्फे सांत्वनपर आर्थिक मदतही केली.
यामध्ये पालकमंत्री वडेट्टीवार यांनी मृतक वनश्रीच्या वडिलांना चंद्रपूर मनपात कंत्राटी तत्वावर नोकरी द्यावी असे पत्र आयुक्तांना दिले. Aam Aadmi party
मात्र त्या पत्राचा काही उपयोग झाला नाही, मृतक वनश्रीच्या वडिलांनी पालिकेच्या शंभर वेळा चकरा मारल्या, नोकरी काही मिळाली नाही.
घरची परिस्थिती हलाखीची होती, यातच राजकीय पुढाऱ्यांचे खोटे आश्वासन यावरून ते खचून गेले होते.
अश्यात आम आदमी पार्टीने मृतक वनश्री आंबटकर ला न्याय मिळायला हवा अशी मागणी केली.
आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, मयूर राईकवार, राजू कुडे यांनी पत्रकार परिषद घेत पालकमंत्री वडेट्टीवार, खासदार धानोरकर, आमदार मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवार यांच्यातर्फे आंबटकर कुटुंबाला दिलेला शब्द पूर्ण करण्याची मागणी केली.
मृतक वनश्रीचे प्रकरण जलद गती न्यायालयात सुरू करावे, वनश्री च्या वडीलाला पालिकेत नोकरी द्यावी, विशेष सरकारी वकील नेमण्यात यावा अशी मागणी आम आदमी पक्षाने केली.