गडचांदूर :- गडचांदूर येथील प्रगतशील नाभिक युवा मंडळाच्या तरूणांनी नाभिक समाज बांधवांची भेट घेऊन नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत नवीन वर्षात पदार्पण केले.भविष्यातील सामाजिक उपक्रमात सर्वांचा हातभार व सहभाग असावा या उद्देशाने श्री.संत नागाजी महाराज यांची प्रतिमा असलेली Donation box दानपेटी देत याचे महत्व सांगण्यात आले.सदर उपक्रमाच्या माध्यमातून गडचांदूर शहरातील सर्व सलून दुकानांमध्ये दानपेटी देण्यात आल्याची माहिती असून असेच नवनवीन उपक्रम आपण सर्वांनी राबवायला पाहिजे. जेणेकरून या माध्यमातून सर्व समाज बांधव एकत्रित जुळून राहील.भविष्यात सुद्धा असेच उपक्रम राबवून समाजाला नवी दिशा देण्याचे कार्य करू,असे मत जिल्हा नाभिक युवाशक्ती सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते विनोद कडूकर यांनी यानिमित्ताने व्यक्त केला आहे.या उपक्रमात सामाजिक कार्यकर्ते नितीन नागमोते, गजानन दैवलकर,संदीप दरवे, अतूल नागमोते, आकाश चौधरी,उमेश लांडगे ओमप्रकाश नक्षीने, प्रशांत हनुमंते सह इतरांनी सहभाग नोंदविला.सदर उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.