प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मूल - मुल तालुक्यातील नवेगाव भूजला येथे युवा परीवर्तन संघटनेच्या वतीने सावित्री जन्मोत्सवानिमित्य विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ग्रामस्वच्छता, बि. पि. व शुगर (मधुमेह)तपासणी , स्त्रियांसाठी रांगोळी स्पर्धा, प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुक व पेन वितरण व व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.
Obc ओबीसी समाज: दशा आणि दिशा या विषयावर प्रा. दिलिप सोळंके सर , यशदा मार्गदर्शक यांनी आपल्या नाविन्यपूर्ण शैलीतून ओबीसी समाजाने Superstition अंधश्रद्धा आणि खोट्या प्रतिष्ठेतुन बाहेर यायला हवं. ओबीसी समाजामध्ये Level of education शिक्षणाचा स्तर सुधारायला हवं आणि वैचारिक श्रीमंत होण्याची गरज आहे असं त्यांनी मांडलं.
मुलांच्या जडणघणीमध्ये पालकांची भुमिका या विषयावर मा. डॉ. मयूर कळसे सर, संवर्ग विकास अधिकारी पं. स.मुल यांनी मांडणी केली ते म्हणाले की जग झपाट्याने बदलत आहे. नव्या युगामध्ये आपली मुलं घडवायची असतील तर पालकांनी सुद्धा अपडेट राहणे गरजेचं आहे.
व्याख्यानमालेला उपस्थीत पाहुण्यांच्या हस्ते ज्ञानज्योती सार्वजनिक वाचनालयाच औपचारिक उद्घाटन करण्यात आलं. रांगोळी स्पर्धेचे वितरण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले प्रथम क्रमांक सौ. स्नेहा हिराजी चुदरी तर द्वितीय क्रमांक सौ. शोभा विलास घोगरे यांना पारितोषिक वितरित करण्यात आलं.कार्यक्रमानिमित्त लहान मुलांच्या कलेला वाव मिळावा या हेतूने नृत्य घेण्यात आले.
व्याख्यानमालेला प्रमुख वक्ते मा. दिलीप सोळंके सर, प्रमुख वक्ते मा. डॉ. मयूर कळसे सर, संवर्ग विकास अधिकारी पं. स. मुल, प्रमुख उपस्थिती मा. अमोल पा. चुदरी माजी उपसभापती पं. स. मुल, प्रा.अनिल दहगावकर सर, जिल्हा संघटक अंनिस
मा. प्रोफेसर सतरे, उपसरपंच नवेगाव भूजला
मुर्लीधर चुदरी, सरपंच बोंडाळा रंजीत समर्थ, सरपंच जूनासुर्ला विचारपिठावर उपस्थित होते.
व्याख्यानमालेला पंचक्रोशीतील अनेक श्रोत्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या याशस्वी आयोजनासाठी युवा परीवर्तन संघटनेच्या सर्व वारकऱ्यांनी खुप मेहनत घेतली आणि कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन केलं.
कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गणेश आरेकर यांनी आणि
आभार सचिन घोगरे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता गावातील होतकरू युवकांच्या वतीने दिलेल्या अल्पोहाराने झाली.
👍👍👍👍👍👌👌👌👌💐💐💐
उत्तर द्याहटवा