चंद्रपूर: आज सकाळी रामाळा तलाव मध्ये मासेमारी करणाÚया जाळीत भला मोठा अजगर साप अडकला. त्याची माहीती मिळताच इको-प्रोच्या सर्पमित्रांनी त्यास सुरक्षितरित्या पकडत रेस्क्यु केले.
Ramala lake
सध्या रामाळा तलावाचे खोलीकरणाचे कामाकरिता तलावातील पाणी सोडण्यात आले असल्यामुळे तलावात काही भागात पाणी आहे. त्या पाण्यात मासेमारी सुरू असुन तिथे टाकण्यात आलेल्या जाळीमध्ये आज पहाटे Dragon snake अजगर जातीचा मोठा साप अडकल्याने भितीचे वातावरण झाले होते. याची माहीती त्वरीत eco pro इको-प्रो चे बंडु धोतरे यांना देण्यात आली. माहीती मिळताच सर्पमित्र बंडु धोतरे आपले सहकारी Snake friend सर्पमित्र राजेश व्यास यांचेसह रामाळा तलावाच्या पात्रात पोहचले. जवळपास आठ फुट लांबीचा अजगर साप मासेमारी करण्याचे जाळीत तोंडाकडील भाग पुर्णपणे अडकलेला होता. तलावात पाणी वाहुन येणाÚया नाल्यामधुन सदर अजगर साप आल्याची शक्यता आहे. सर्पमित्रांनी अजगर सापास सुरक्षितरित्या पकडुन त्यास गंुडाळले गेलेले जाळयातुन सुटका केली. यावेळी स्थानिक मासेमारी करणारे भोई बांधवानी अजगर रेस्क्युच्या कामात सहकार्य केले.
यानंतर सदर अजगर साप rescue रेस्क्यु केल्याची माहीती चंद्रपुरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल कारेकर यांना देण्यात आली. सदर अजगर चंद्रपूर आरआरयु च्या ताब्यात देउन तसेच वनविभाग तर्फे पंचनामा करून त्यास लोहारा-जुनोना जंगलात निसर्गमुक्त करण्यात आले. यावेळी आरआरयु चे वनपाल भिमराव वनकर, वनरक्षक डेवीड दुपारे, किशोर डांगे, संभा पोईनकर, अंकीत पडगेलवार इको-प्रो चे बंडु धोतरे व सचिन धोतरे उपस्थित होते.