सिंधूताईंच्या निधनाने असंख्य अनाथांचे मातृछत्र हरपले : आ. सुधीर मुनगंटीवार
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या , आपल्या कर्तृत्वाने अनाथांची माय अशी ओळख निर्माण करणाऱ्या माई अर्थात पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांच्या निधनाने असंख्य अनाथांचे मातृछत्र हरपले अशी शोकभावना माज़ी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
Sindhutai sapkal
माईंनी अनाथांच्या कल्याणासाठी अवघे आयुष्य वेचले. त्यांचे संघर्षमय आयुष्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. निस्वार्थ समाजसेवा कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे माई. त्यांचा प्रेमळ स्वभाव व वात्सल्यमयी व्यक्तिमत्व या माध्यमातून त्यांनी असंख्य भारतीयांच्या मनात घर निर्माण केले. अनाथांची माय होताना त्यांच्या व्यथा वेदनांशी त्या एकरूप झाल्या. बेटा असे संबोधत त्यांनी अनेकांवर मायेचा वर्षाव केला .त्यांच्या निधनाने असंख्य अनाथांचे मातृछत्र हरपले अशी शोकभावना आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
Padmashree
अनाथांची माय हरपली - आ. किशोर जोरगेवार
अनाथांची माय म्हणून देशभरात ओळख निर्माण करणाऱ्या सिंधुताई सपकाळ अर्थात माई यांच्या निधनाची बातमी मनसुन्न करणारी आहे. त्यांच्या जाण्याने अनाथांची माय कायमची हरपली असल्याची भावना सिंधूताई सपकाळ यांच्या निधनानंतर दिलेल्या शोकसंदेशातून व्यक्त केली आहे.
अत्यंत विपरीत परिस्थितीत सिंधुताई सपकाळ यांनी समाजसेवेचा वसा हाती घेतला. खरतड मार्गाने त्यांनी केलेला यशस्वी प्रवास, त्यांचा हा जिवनसंघर्ष येत्या काळातही अनेक भावी पिढ्यांना प्रेरणा देत त्यांच्या कार्याला उजाळा देत राहील. त्यांच्या या भेटीतून नवी ऊर्जा मिळायची. त्या आमच्या चंद्रपूर जिल्ह्या लगतच्या वर्धा जिल्ह्यातील होत्या त्यांच्या अनेक सत्यकथा समाजाला नेहमीच प्रेरित करत राहतील. ज्यांच कोणी नाही अशा अनाथांना मातृप्रेम देणाऱ्या मातेला देश कधीही विसरणार नाही. माई अशी अचानक आमच्यातून निघून गेल्याने सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या जाण्याने सामाजिक क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. अशी भावना या शोकसंदेशात आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली आहे.
प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले - महापौर - राखी कंचर्लावार
अनाथांची माय होऊन त्यांचे भवितव्य घडवण्यासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका, पद्मश्री सिंधुताई सपकाळ (७३) यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावणारी आहे. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत समाजकार्याचा एक वेगळा वस्तूपाठ त्यांनी घालून दिला. सिंधुताई प्रामाणिकपणे काम करत राहिल्या. जगभरात त्यांच्या या कार्याची दखल घेतली गेली. त्यांच्या अचानक जाण्याने प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे, अशा शोकभावना चंद्रपूरच्या महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी व्यक्त केल्या.
हजारो अनाथ बाळांचे मातृत्व हरपले - संदीप गिर्हे, शिवसेना जिल्हाप्रमुख
हजारो अनाथ, बाळ व मुलांचे प्रेरणास्थान हे वर्धा जिल्ह्यातील माई सिंधुताई सपकाळ हे होतं.
आयुष्यातील संघर्षमय परिस्थितीला मात देत अनाथ बाळांना आयुष्यात जगण्यासाठी समर्थ बनविले, मात्र अचानक त्यांच्या जाण्याने देशाची मोठी हानी झाली आहे, त्यांची कमतरता न भरून निघणारी आहे, नुकतंच त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
हजारो अनाथ बालकांवर त्यांनी केलेला मायेचा वर्षाव कधी न विसरणारा आहे, चंद्रपूर जिल्हा शिवसेनेतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.