गडचांदूर :- कोरपना तहसील कार्यालयातर्फे 3 जानेवारी रोजी गडचांदूर येथे महाराजस्व अभियान सन 2021,22 चे आयोजन करण्यात आले होते.यात शेतीचा सातबारा, शैक्षणिक,अधिवास,रहिवासी,जात प्रमाणपत्रांसह इतर प्रमाणपत्र व योजनांची सखोल माहिती एकच ठिकाणी देण्यात आला.असे असताना शासनपत्रानुसार सदर अभियान राबविण्यापुर्वी शहरात याची जाहिरात व प्रसिद्धी करणे अनिवार्य होते.मात्र येथील मंडलाधिकारी व तलाठी यांच्या गलथान कारभारामुळे लोकांपर्यंत याची माहितीच पोहचली नाही.परिणामी अनेक शेतकरी व संबंधित नागरिकांना यापासून वंचित राहावे लागले असा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाच्या सतिश बिडकर यांनी एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे केला आहे. Prahar
महसूल प्रशासन अधिक लोकभिमुख कार्यक्षम,गतिमान व पारदर्शक करण्यासाठी, महाराजस्व अभियान राबविण्याबाबत लोकसेवा हक्क अधिनियम 2015 ची प्रभावी अंमलबजावणी, प्रचार, प्रसिध्दी व विशेष शिबीरे घेवुन विहीत दाखले प्रदान करणे,असे उद्देशून 29 डिसेंबरच्या पत्रात तहसीलदारांनी दिले.मात्र असे झाले नसून हे अभियान केवळ दिखावा तर नाही ना अशी शंका नागरिकांकडून व्यक्त होत आहे.वास्तविक पाहता ज्या नागरिकांसाठी हे अभियान राबविण्यात आले त्यांना याची माहिती मिळणे गरजेचे होते पण अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे हे शक्य झाले नाही असा आरोप बिडकर यांनी केला आहे.सदर अभियान 31जानेवारी पर्यंत सुरू राहणार असल्याने आतातरी याविषयीची पुर्व माहिती मिळणार का ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.