चंद्रपूर - कोरोना काळात लागलेल्या लॉकडाउन मध्ये हजारो मजूर आपल्या गावी स्थलांतरित झाले होते, मजुरांच्या जाण्याने औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या संख्येत कमालीची घट झाली. जे राहिले त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती,
पुन्हा ती परिस्थिती उदभवू नये यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाने नोंदणी व अनोंदणीकृत कामगारांसाठी मध्यान्ह भोजन पुरविण्याचा निर्णय घेतला. Just kitchen
चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल 44 हजार 850 कामगारांची नोंद असून त्यामध्ये 7 हजार कामगारांना मध्यान्ह भोजन पुण्यातील जस्ट किचन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे मागील जून 2021 पासून दिल्या जात आहे. Pollution
दाताला येथील एमआयडीसी परिसरात जस्ट किचनने आपला प्रकल्प उभारला आहे, मात्र जेवण बनविल्यानंतर प्रकल्पात सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी काही व्यवस्था नसल्याने जवळील नाल्यात हे सांडपाणी सोडल्या जाते मात्र सदर नाल्यातील सांडपाणी हे समोर इराई नदीत विलीन होतो. Chandrapur midc
सदर नाल्यातील सांडपाण्याचे पाणी पिल्याने काही जनावरे सुद्धा दगावली आहे. Irai river
कंपनी व्यवस्थापनाने प्रिव्हेन्शन ऑफ वॉटर पोलुशन ऍक्ट 1974 ची पायमल्ली केली आहे.
आधीच एमआयडीसी हा चंद्रपूर शहरातील प्रदूषित भाग आहे, आणि याच भागात हा प्रकल्प उभारल्याने महाराष्ट्र प्रदूषण मंडळ तर्फे जस्ट किचन प्रकल्पाला परवानगी कशी मिळाली? व सांडपाण्याचे नियोजन नसल्याने इराई नदी ला प्रदूषित करण्याचे काम जस्ट किचनतर्फे सुरू असून याबाबत प्रदूषण नियंत्रक मंडळाने कारवाई का केली नाही असा प्रश्न यावेळी उपस्थित होतो.