News34 Chandrapur
चंद्रपूर/सावली - चंद्रपूर जिल्ह्यात मागील 1 आठवड्यापासून कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना प्रशासनाने नवी नियमावली लागू केली आहे. COvid19 restrictions
मास्कचा वापर, जमावबंदी आदेश असे अनेक नियम नागरिकांनी पाळायचे आहे, 2 दिवस आधी चंद्रपुरातील लोहारा येथे पंजाबी समाजाच्या लोहडी कार्यक्रमावर पोलीस प्रशासनाने कोरोना नियम मोडल्याने कारवाई केली होती. corona crowd
अशी कारवाई पोलीस प्रशासनाने केल्याने ते अभिनंदनास पात्र आहे मात्र जेव्हा स्वतः प्रशासन या कोरोना नियमांना धुडकावीत अधिकृत गर्दी जमवित असेल तर त्यावर कारवाई का नाही? No mask
सदर कोरोना गर्दीचा अधिकृत कार्यक्रम जिल्ह्याचे पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या मतदार संघात करण्यात आला ते सुद्धा वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली, मात्र ज्यावेळी या कार्यक्रमात गर्दी झाली होती तेव्हा प्रशासनाने कारवाई करणे टाळले, हा कसला दुजाभाव आहे, म्हणजे कोरोनाचे नियम हे राजकीय व शासकीय कार्यक्रमावर लागू होत नाही काय?
Corona increase
वडेट्टीवार साहेब, दिव्यांग व्यक्ती माणसं नाहीत का? असा सवाल चंद्रपूरकर विचारत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात प्रशासनाने कोरोना कायदे लागू असताना दिव्यांग प्रमाणपत्र मेळावे आयोजित केले. यात हजारोंची गर्दी झाली. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री असलेल्या पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या ब्रम्हपुरी मतदारसंघात एकूण 3 मोठी आयोजने झाली. आधी ब्रम्हपुरी, नंतर सिंदेवाही व आज सावलीत हजारावर दिव्यांग बांधव सरकारी आवाहनाने एकत्र आले. पालकमंत्र्यांचे उजवे हात असलेले पदाधिकारी अभिमानाने म्हणतात दिव्यांगांनी प्रचंड गर्दी केली. अधिकारी म्हणतात पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या निर्देशानुसार कार्यक्रम झाला. जिल्ह्याची कोरोना रुग्ण संख्या 1500 च्या जवळ पोहचली असताना ही अधिकृत गर्दी कुणी जमवली?, राज्यात कोरोना नियम अंमलबजावणी करणारे हात या आयोजनाबाबत गप्प का? असे सवाल उपस्थित झाले आहेत. पंजाबी समाजाने संक्रांतीचा lohadi लोहडी कार्यक्रम 60 लोकांत आयोजित केल्यावर प्रशासनाने त्यांना 62 हजाराचा दंड करत गुन्हे नोंदविले. दिव्यांगांची ही अफाट गर्दी बोलावून कार्यक्रम घेणा-यांवर कारवाई कधी आणि कोण करणार यावर सध्या तरी उत्तर नाही.