प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - बल्लारपूर तालुक्यातील ग्रा.पं. किन्ही येथे म.ग्रा.रो.ह.यो. अतंर्गत बोडी खोलीकरण (अनुसया सुरेश नैताम किन्ही) यांच्या शेतात बोडी खोलीकरण चे कामावरुन सुट्टी झाल्यानंतर दुपारी 3 ते 3.30 च्या दरम्यान प्रकाश अलाम किन्ही हा मजुर कामाच्या ठिकाणी बाजूला शौचासाठी गेले असता Bear attack अस्वल ने त्यांच्यावर झडप घातली, त्यात मजुर जखमी झाला, त्याला बल्लारपुर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर समोरील उपचारासाठी चंद्रपुर येथील सरकारी दवाखान्यात भरती करण्यात आले, आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. वनविभाग आणि पोलिस संयुक्त चौकशी करीत आहेत.