प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - 24 जानेवारीला शहरातील जुने बस स्थानकाजवळील श्री खंडेलवाल ज्वेलर्स मध्ये दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास 1 लाख 53 हजार 965 रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाल्याची खळबळ जनक घटना घडली. Jewelry shopसदर चोरी मध्ये दुकानातील 10 ग्राम सोन्याची काइन, 19 ग्राम चा नेकलेस या दागिन्यांचा समावेश असून संशयित आरोपी हा पांढऱ्या रंगाच्या गाडीतून आला होता, वाहनात 2 जण असून एक ज्वेलरी दुकानात आला व दुसरा वाहनात बसून होता अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. Ballarpur crime
दिवसा ढवळ्या शहरातील पोलीस स्टेशन जवळून हाकेच्या अंतरावर असलेल्या खंडेलवाल ज्वेलरी शॉप मध्ये चोरीचा हा प्रकार म्हणजे पोलिसांना आव्हान देणारा होय, घटनेचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील करीत आहे.