चंद्रपूर - वडगाव प्रभागातील झालेल्या निवीदा कामा सबंधात एक कोटी रुपयांचा भ्रष्टाचार Corruption नुकताच आम आदमी पक्षाने उघडकीस आणला.
या घोटाळ्याशी संबंधित आम आदमी पक्षाने संबंधीत Ministry of Urban Development नगर विकास मंत्रालय तथा विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली. फोनद्वारे संबंधीत अधिकारी यांचेकडे विचारणा केली असता आधी आयुक्त यांना भेटण्यास सांगितले गेले व त्यांची प्रतीक्रीया घेण्यास सांगण्यात आले त्यामुळे आम आदमी पक्षाचे पदाधिकारी मनपा आयुक्त याना भेटण्यास गेले असता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दीड ते दोन तास ताटकळत ठेवले. व भेट न देता तिथून निघून गेले. त्यावेळेस आम आदमी पक्षाने त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की माझ्याकडे सध्या वेळ नाही मी या विषयावर बोलू शकत नाही.मला वेळ मिळेल तेव्हाच मी तुम्हाला भेटणार सध्या तरी मी कधी भेटणार ते सांगत नाही अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. प्रत्यक्षात पाहता हे संपूर्ण प्रकरण मनपा आयुक्त यांच्या स्वाक्षरीने झाले असल्याचा अंदाज आम आदमी पक्षाने वर्तविला आहे या प्रकरणात वडगाव प्रभागातील इंजिनिअर भारती याना विचारना केली असता त्यांनी सुद्धा माहिती नाही अशी उडवाउडवीची उत्तरे दिली आम आदमी पक्षाने कोणीच उत्तर देत नसल्यामुळे येत्या 27 तारखेपर्यंत या प्रकरणात दोषी अधिकारी व पदाधिकाऱ्यांना कारवाई होत नसेल तर 27 तारखेपासून आम आदमी पक्षाचा ठिय्या आंदोलन महानगरपालिकेसमोर होईल अशी घोषणा जिल्हाध्यक्ष तथा मनपा प्रभारी सुनिल देवराव मुसळे तथा युवा जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार यांनी केली आहे. Aap Chandrapur
या वेळी जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी ,शहर उपाध्यक्ष सिकन्दर सागोरे, शहर सचिव राजू कूड़े,जिल्हा सोशल मिडिया हेड राजेश चेटगुलवार ,बल्लारपुर शहर अध्यक्ष रवि पुप्पलवार, शहर कोषाध्यक्ष आसिफ शेख, कालिदास ओरके इत्यादि उपस्थित होते.