चंद्रपूर - महाराष्ट्राची मदर तेरेसा अशी ओळख असणाऱ्या सिंधूताई सपकाळ यांचे निधन झाले असून त्यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
आज त्यांचे पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी निधन झाले. त्या ७३ वर्षांच्या होत्या. महिना भरापूर्वी त्यांचे हर्निया चे ऑपरेशन झाले होते, त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते, आज अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गॅलक्झी केअर हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश पुणतांबेकर म्हणाले, sindhu tai sapkal "सिंधुताई यांना छातीचा हार्निया झाला होता. त्याच्यावर दीड महिन्यांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होतो. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले."
१४ नोव्हेंबर १९४७ रोजी विदर्भातील वर्धा जिल्ह्यात झाला. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी आहे. आई-वडिलांना मुलगी नको असल्याने त्यांनी तिचे नाव चिंदी ठेवले होते.
घरची गुरं राखायला म्हणून रोज सकाळी बाहेर पाठवायचे आणि त्या शाळेत जाऊन बसायच्या. मूळच्याच बुद्धिमान असल्या तरी जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत त्यांना शिकता आले. Sindhu tai sapkal ashram
सिंधुताई सपकाळ नऊ वर्षांच्या असताना त्यांचा विवाह २६ वर्षांने मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला. त्यांना प्रचंड सासूरवास सोसावा लागला. जंगलातील लाकूडफाटा, शेण गोळा करताना सापडलेले कागदाचे तुकडे माई घरी आणायच्या आणि उंदराच्या बिळात लपवून ठेवायच्या. क्वचितच घरी एकट्या असल्या तर त्या अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत होत्या. वयाच्या अठराव्या वर्षांपर्यंत माईंची तीन बाळंतपणं झाली. त्या चौथ्यांदा गर्भवती असताना आयुष्यातला पहिला संघर्ष केला. Indian social worker
एकदा जळगाव जिल्ह्यातील पिंपराळे स्टेशनवर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला. परंतु, लहान मुलीचा जीव घेतला, तर पाप लागेल म्हणून मागे फिरल्या. मग पुन्हा भीक मागत पोट भरणे सुरू झाले. सिंधुताई दिवसभर भीक मागायच्या आणि रात्री रेल्वे स्टेशनवरच झोपायच्या. स्टेशनवरच्या सगळ्या भिकाऱ्यांना बोलावून त्या मिळालेल्या अन्नाचा काला करायच्या आणि मग सर्व भिकारी एकत्र बसून जेवायचे. Orphanage
सिंधुताई यांनी अनाथ मुलांच्या जीवनाला दिशा मिळण्यासाठी 'ममता बाल सदन' संस्थेची स्थापना केली. ही स्थापना १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात सुरू केली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले. त्यांनी बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. Padma shri award
सिंधुताई सपकाळ या गेली 40 वर्षे सामाजिक कार्य करत होत्या. त्यांना आजवर 750 हून अधिक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. अनाथ मुलांना आईसारखी माया देणाऱ्या सिंधुताई नेहमी अभिमानाने सांगायच्या की, मी हजारहून अधिक मुलांची आई आहे.
सिंधुताई यांनी अन्य समकक्ष संस्थाही स्थापन केलेल्या आहेत त्या याप्रमाणे
बाल निकेतन हडपसर, पुणे
सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह , चिखलदरा
अभिमान बाल भवन, वर्धा
गोपिका गाईरक्षण केंद्र, वर्धा ( गोपालन)
ममता बाल सदन, सासवड
सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था, पुणे