प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - विवेकानंद वार्डातील कर्तव्यदक्ष नगरसेवक श्री अरुण भाऊ वाघमारे यांचे हस्ते मागील ५/६वर्षांपासून ध्वजारोहण कार्यक्रम होत आहे ,या निमित्ताने का होईना पण भाऊंचा वार्डातील जनतेसोबत जवळून संपर्क येत असून, त्या द्वारे भाऊंचे मार्फत जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या अरुण भाऊंचे तेथील सार्वजनिक हनुमान मंदिराच्या विस्तार करण्यात मोठा हातखंडा आहे ,मंदिराच्या नवनिर्माण करण्यासाठी अरुण भाऊंनी १५/१६लाख रुपयांचा निधी ईतरांमार्फत उपलब्ध करून दिला आहे ,त्याचप्रमाणे वार्डातील सर्व सुधारणा करण्यासाठी भाऊ सदैव तयार असतात.
असा नगरसेवक लाभणे म्हणजे आमचं भाग्यच..अशी प्रतिक्रिया विवेकानंद वार्डातील जनतेच्या मुखातून सतत ऐकायला मिळते.
