चंद्रपूर - चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणूक अवघ्या 2 महिन्यांनी होणार असून सर्व राजकीय पक्ष आपल्या तयारीला लागले आहे.
राज्यात सध्या कांग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने युती करीत महाविकास आघाडी सरकार स्थापन करीत भाजपला धोबीपछाड दिले.
मात्र स्थानिक निवडणुकीत ही युती कायम राहणार का यावर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नगरपंचायत निवडणुकीत कांग्रेस ने बाजी मारली, त्यात काही वाटा शिवसेना व राष्ट्रवादी कांग्रेसचा होताचं. Election
राष्ट्रवादी कांग्रेसने नगरपंचायत निवडणुकीत चांगलेच सदस्य निवडून आणले तसेच शून्यावर खेळी खेळत शिवसेनेने 6 जागा जिंकल्या.
मात्र मनपा निवडणुकीत तिन्ही पक्ष आपली वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. Bjp win again
बुधवारी कांग्रेसने महानगरपालिका संदर्भात बैठक घेत कांग्रेस हा मनपा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष असण्याची घोषणा पालकमंत्री वडेट्टीवार यांनी करीत कार्यकर्त्यांना आतापासून निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश दिले.
तर दुसऱ्या दिवशी शिवसेना व राष्ट्रवादी कांग्रेसची निवडणूक संदर्भात बैठक पार पडली, युती करायची काय? यावर बैठकीत चर्चा झाली, कोण किती जागा लढणार? काय रणनीती आखायची यावर प्राथमिक चर्चा करण्यात आली. Mahavikas aghadi
सध्या तिन्ही पक्ष आपली दिशा वेगळी ठरविण्याचा प्रयत्न करीत आहे.
मनपा अस्तित्वात आल्यावर झालेल्या निवडणुकीत कांग्रेस व भाजपने अभद्र युती करीत गृह करात प्रचंड वाढ केली, तर आता पुन्हा सत्तेत येण्याचं स्वप्न बघून कांग्रेस काय विकास करेल की भाजपच्या वाटेवर चालणार ही येणारी वेळ सांगेल.
मनपात सत्तेत असलेल्या भाजपने सर्व पक्षातील नगरसेवकांना स्थायी समिती मध्ये सदस्यपद दिले, कार्यकाळ सम्पल्यावर त्याच नगरसेवकांनी भाजपवर आरोप करणे सुरू केले, पदावर असले की गप्प पद गेले की गदारोळ हे आता नागरिकांना समजले असून येणाऱ्या निवडणुकीत हा बदल दिसेलचं.
मनपात सत्तेत असलेल्या भाजपने मनपात अनेक कारनामे केले मात्र त्यावर अंकुश लावण्यात महाविकास आघाडी अयशस्वी ठरली.
आम आदमी पार्टी व जनविकास सेना वगळता कुणीही मनपा भ्रष्टाचार यावर बोलले नाही, निवडणूक आली की सत्ताधारी यांचे घबाड बाहेर आणायचे मात्र जेव्हा उघडपणे हे भ्रष्टाचार झाले त्यावेळी सदर तिन्ही पक्ष मृग गिळून गप्प बसले होते. या 5 वर्षात पालिकेत विरोधी पक्षाची भूमिका कुणीही सक्षमपणे पार पाडली नाही.
तिन्ही पक्षांच आपसात काही आलबेल नसल्याने येत्या मनपा निवडणुकीत भाजपला याचा फायदा झाल्यास आश्चर्य मानू नये.
मी पुन्हा येईन च्या ब्रीद वाक्यावर भाजप पुन्हा मनपात सत्तेत येऊ शकणार.
