चंद्रपूर /वृत्तसेवा - Star Health and Allied Insurance ने आपल्या ग्राहकांसाठी उत्तम सेवा सुरू केली आहे. ग्राहकांना ही सेवा मोफत आणि घरी बसून वापरता यावी यासाठी whatsapp व्हॉट्सअॅप सेवा सुरू करण्यात आली आहे.
स्टार हेल्थने कोरोनाच्या काळात ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेऊन ही सेवा सुरू केली आहे.
या स्टेप्स फॉलो करा.
कंपनीने सांगितलेल्या नियमांनुसार, व्हॉट्सअॅप सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एकच मेसेज पाठवायचा आहे. सर्वप्रथम तुमच्या व्हॉट्सअॅप नंबरवरून +91 95976 52225 या नंबरवर ' Hi ' पाठवा. • कंपनीच्या या सेवेद्वारे तुम्ही नवीन पॉलिसी सहज खरेदी करू शकता. याशिवाय तुम्ही cashless claims कॅशलेस क्लेम दाखल करू शकता. तसेच तुम्ही तुमच्या सोयीनुसार पॉलिसी दस्तऐवज डाउनलोड करू शकता.
व्हॉट्सअॅपवरील ही सेवा ग्राहकांसाठी नेहमीच सुरक्षित राहील. व्हॉट्सअॅप मेसेजिंग प्लॅटफॉर्मचे एन्क्रिप्शन हे सुनिश्चित करते की ग्राहकांसोबत शेअर केलेले तपशील सुरक्षित आणि लपलेले राहतील. याशिवाय, स्टार हेल्थचे ग्राहक कंपनीच्या चॅट असिस्टंट- ट्विंकल, कस्टमर केअर नंबर, एजंट, अधिकृत वेबसाइट, शाखा कार्यालय आणि स्टार पॉवर ॲपद्वारे Insurance विमा कंपनीपर्यंत पोहोचू शकतात.
