चंद्रपूर - जिल्ह्यात वाढते अपघाताचे प्रमाण बघता पुन्हा वाहतूक विभागामार्फत हेल्मेट शक्तीचा आदेश जारी करण्यात आला आहे. Helmet
सोमवार 17 जानेवारीपासून हा आदेश लागू झाला आहे, चंद्रपूर जिल्ह्यात जानेवारी 21 ते नोव्हेंबर पर्यंत तब्बल 350 Accident अपघात झाले त्यात 197 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू तर 144 नागरिक गंभीर जखमी झाले. Bahubali Helmet
मात्र हे अपघात दुचाकी वाहन की चारचाकी वाहनाचे याबाबत काही माहिती प्रसिद्ध करण्यात आली नाही.
हेल्मेट परिधान करणे हे मोटार वाहन कायद्यांतर्गत आहे मात्र हा नियम लागू करण्यासाठी वाहतूक विभागाला चांगले नाकीनऊ येतात, जिल्ह्यात आजपर्यंत अनेक पोलीस अधीक्षकांनी wear helmet हेल्मेट सक्ती नियम लागू करण्याचा प्रयत्न केला मात्र तो अखेर निष्फळ ठरला.
हेल्मेट सक्ती सोमवार पासून लागू होत आहे आधी पोलीस कर्मचारी नंतर इतर शासकीय विभागातील कर्मचारी व अखेर जनतेसाठी हा नियम लागू होणार आहे.Helmet mandatory
मात्र ही सक्ती हायवे मार्गावर असणार की शहरात यावर नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.
