प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती Cooperative Bank सहकारी बँकेला झालेल्या नफ्यामधून केवळ शेतकऱ्यांच्या कल्यानासाठी आणि शेतकऱ्यांचे आरोग्य जोपासून त्यांना आरोग्य मुक्त जीवन जगण्यासाठी सक्षम ठेवने हेच CDCC बँकेचे कर्तव्य आहे. यासाठीच शेतकरी कल्याण निधीची तरतूद करण्यात आली असून जमा झालेल्या शेतकरी कल्याण निधीचा उपयोग शेतकऱ्यांचे व शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे जीव वाचविण्यासाठी प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन मदत देण्यात येत असल्याचेही सांगितले. तालुक्यातील मौजा फुटाना येथील अल्पभूधारक गरीब Farmer शेतकरी बालाजी नारायण शेरकी हा अनेक दिवसांपासून कँसरच्या आजाराने त्रस्त असून त्याच्या उपचारासाठी व त्याचा जीव वाचविण्यासाठी बँकेच्या शेतकरी कल्याण निधीमधून तीस हजार (३०,०००) रुपये शेतकरी कल्याण निधीमधून मदत म्हणून रुग्णाला Check चेक देतांना ते बोलत होते. रुग्णाला आर्थिक मदतीची नितांत गरज असल्याची माहिती कांग्रेसचे नेते तथा बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांना प्राप्त होताच संतोषसिंह रावत यांनी फुटाना येथे तात्काळ कॅन्सरग्रस्त रुग्णाच्या प्रत्यक्ष घरी जाऊन चेक दिला. या प्रसंगी तालुका कांग्रेसचे कमेटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, शहर कांग्रेसचे अध्यक्ष सुनील शेरकी, माजी पं. स. सभापती वासुदेव पाल, माजी उपसभापती दशरथ वाकुडकर, नांदगाव सरपंच हिमानी वाकुडकर, बोडाला सरपंच जालिंदर बांगरे, माजी सरपंच योगेश शेरकी, माजी उपसभापती बापूजी चिंचोलकर, माजी उपसरपंच किशोर अर्जुनकार, सक्रिय कार्यकर्ते मदन चांदवार, विष्णू व्याहडकर, भारत चौधरी, चंद्रहास खोब्रागडे, नंदकिशोर दुधे, अजय शेरकी, महादेव देशमुख, नितेश शेरकी, जोंधुजी पाल, सचिन शेरकी यांचेसह फुटांना येथील अनेक नागरिक उपस्थित होते. कॅन्सरग्रस्त रुग्णास मदतीची गरज लक्षात घेऊन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाणारी एकमेव बँक असल्याचे बोलले जात आहे. बँकेचे अध्यक्ष कांग्रेसचे नेते तथा माजी जि. प.अध्यक्ष संतोषशिंह रावत यांनी बँकेचे सूत्रं हाती घेतल्या बरोबर बँकेच्या विकासाच्या दृष्टीने आणि शेतकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी एकमेव बँक म्हणून प्रसिद्ध होत असलेल्या बँकेला मिळालेल्या आर्थिक नफ्यातून धोरणात्मक बदल करून शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना Cancer कँसर सारखे दुर्धर आजार झाल्याने शेतकरी खचतो म्हणून शेतकऱ्यांच्या घरी जाऊन तात्काळ उपचारासाठी आर्थिक मदत देऊन रुग्णाला व त्यांच्या कुटुंबीयांना पुनर्जीवित करण्याचे कार्य करीत असल्याने फुटाना वासीय ग्रामस्थांनी संतोषसिंह रावत व बँकेचे आणि समस्त संचालक मंडळांचे आभार मानले आहे.