चंद्रपूर - Hi-Tech कॉलेज ऑफ फार्मसी पडोली चंद्रपूर येथे B-pharm प्रथम वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा कॅप राऊंड द्वारे वर्ष 2020 - 21 यासाठी कॉलेजमध्ये ऍडमिशन झाले आहे. प्रवेश झाल्यानंतर अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय विभागातर्फे दिली जाणारी 'फ्रीशिप' साठी फॉर्म भरले आहे.
फॉर्ममध्ये कुठलीच त्रुटी अथवा कागदपत्रांची कमतरता नाही याची प्रत कॉलेज कडे देखील उपलब्ध आहे, तरीपण विद्यार्थ्यांना कॉलेजची संपूर्ण College Fees फीस भरण्यासाठी कॉलेज कडून वारंवार दबाव टाकण्यात येत आहे. यासंदर्भात समाज कल्याण विभागाकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून देखील काही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, व असे कारण सांगण्यात येत आहे की ज्या कॉलेज कडे NAC सर्टिफिकेट नाही त्या कॉलेजला आम्ही 'फ्रीशिप' देत नाही ,पण विद्यार्थ्यांचा व NAC - सर्टिफिकेट चा काहीही संबंध नाही, NAC - सर्टिफिकेट मिळवणे ही सर्वस्वी जबाबदारी कॉलेजची आहे, समाजकल्याण विभागाने सुद्धा विद्यार्थी विद्यार्थ्यांचा फ्रीशिप चा फॉर्म कॉलेजला Revert केला आहे. विद्यार्थ्यांची ऍडमिशन ही सर्व सरकारी नियमानुसार व सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून झालेली आहे, तरीसुद्धा विद्यार्थी व त्यांच्या पालकांवर कॉलेज मार्फत संपूर्ण फिस भरण्यासाठी दबाव टाकून त्यांना मानसिक त्रास देण्यात येत आहे. फिस जर भरली नाही तर, विद्यार्थ्यांचे मूळ कागदपतत्रे परत देणार नाही व तुमचा ऍडमिशन देखील कॅन्सल होऊ शकतो ,अशाप्रकारे College कॉलेज कडून सांगण्यात येत आहे. तरी Hi-Tech कॉलेज ऑफ pharmacy फार्मसी पडोली, चंद्रपूर, या कॉलेज मार्फत विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांना होणारा त्रास लक्षात घेता तसेच विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ न देता विद्यार्थ्यांना न्याय द्यावा या आशयाचे निवेदन bahujan samaj party बहुजन समाज पार्टी चंद्रपूर तर्फे मान. जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांना देण्यात आले आहे. व या निवेदनाची एक - एक प्रत माननीय पालकमंत्री साहेब चंद्रपूर ,माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री साहेब महाराष्ट्र राज्य व मान.सहाय्यक आयुक्त साहेब समाज कल्याण चंद्रपूर, यांना देखील पाठविण्यात आलेली आहे.