भद्रावती - 3 जानेवारीला चंद्रपूर वन विभागातील उपक्षेत्र भद्रावती येथील चालबर्डी मध्ये एक वाघीण मृतावस्थेत आढळली.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाची चमू चालबर्डी मध्ये दाखल झाली, वाघिणीचा मृत्यू नेमका कशाने झाला यावर अनेक शंका व चर्चा सुरू झाल्या होत्या, वाघिणीची कुणी शिकार तर केली नाही न? यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. Female tiger death
घटनास्थळाची पाहणी केल्यावर विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, सहायक वन संरक्षक निकिता चौरे, एच.पी. शेंडे, पशुवैद्यकीय अधिकारी रविकांत खोब्रागडे, एस.आर.रोडे, एनटीसीएचे प्रतिनिधी बंडू धोत्रे, वन्यजीव मंडळ सदस्य मुकेश भांदककर व प्रतिनिधी यांचे उपस्थितीत वाघिणीच्या मृतदेहाचा शव विच्छेदन करीत अग्निदहन करण्यात आले.
Tiger hunt
प्राथमिक अंदाजा नुसार सदर वाघ ( मादी ) ही जिवंत विद्युत प्रवाहाच्या स्पर्शाने मृत झालेली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सदर वाघ ( मादी ) चे वय 4-5 वर्ष असावे व सदर वाघ ( मादी ) चे दात मिशा शाबुत आहे . सदर प्रकरणी शव विच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर मृत्युचे कारण स्पष्ट होऊ शकेल. प्रकरणी वनगुन्हा नोंदविण्यात आलेला असुन पुढील चौकशी सुरु आहे.