प्रतिनिधी/रमेश निषाद
विसापूर : चिंतामणी विद्यालय विसापूर येथे क्रां.ज्यो. सावित्रीबाई फुले जयंती चे औचित्य साधून प्रा.आरोग्य केंद्र विसापूर द्वारा ०१ ते १५ वयोगटातीलल विद्यार्थ्यांनसाठी मेंदुज्वर रोधक लसीकरण मोहीम राबवण्यात आली होती. त्यामध्ये पात्रता धारक जवळपास २१७ विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला. Vaccination
कार्यक्रमाचे उदघाटन जि.प.सदस्य एड. हरीश गेडाम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले त्यावेळी चिंतामणी विद्यालय व क. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत दोंतुलवार, तालुका आरोग्य अधिकारी सुधीर मेश्राम,वैदकिय अधिकारी सुकेशनी कांबळे व जेष्ठ शिक्षक अरुण टोंगे उपस्थित होते. पावसाळ्यात आणि नंतर साचालेल्या पाण्यात राहणाऱ्या संक्रमित डासाच्या चाव्याद्वारे होऊ शकणाऱ्या मेंदू ज्वर(जपानी एन्सेफलायटीएस/जे.इ.) हा आजार प्रामुख्याने १ ते १५ वयोगटातील मुलांना होऊ शकतो व त्याच्या प्रादुर्भावामुळे मृत्यूही ओढवू शकतो त्या पासून स्वरक्षण मिळावे म्हणून लसीकरण करने किती गरजेचे आहे याचे महत्व दोंतुलवार यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले व त्या अनुषंगानेच पालक सभेत जनजागृती करण्यात आल्यामुळे बहुसंख्य विद्यार्थ्यानी लसीकरण करून घेतले होते. Japanese encephalitis virus
जि.प.आरोग्य विभागा द्वारे दी.३ ते २० जानेवारी पर्यंत ही मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबवण्यात येत आहे त्याचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्रता धारक विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आव्हान एड. गेडाम यांनी केले होते सदर लसीकरण शिबिरासाठी विद्यालयाचे शिक्षक चंद्रकांत पावडे, विना चांदेकर, विनायक काळे, कृशागौतमी खोब्रागडे,संतोषी तगलपल्लेवार, सोनाली आत्राम, शिक्षकेतर कर्मचारी एम. टी पुंडे, सुभाष भटवलकर, रवींद्र कोडापे,विलास देठे व विसापूर प्रा.आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.