चंद्रपूर | शहर महानगरपालिकेचे नवे आयुक्त म्हणून विपीन पालीवाल (मुद्दा) यांच्या नियुक्तीचे आदेश सोमवारी, (ता. ३ जानेवारी) नगर विकास मंत्रालयाने जारी केले.
Rajesh mohite transfer
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 36 नुसार आयुक्त, चंद्रपूर महानगरपालिका या पदावर विपिन पालीवाल (मुद्दा) (मुख्याधिकारी गट-अ निवड श्रेणी) यांची प्रशासकीय कारणास्तव नेमणूक करण्यात येत आहे, असे उपसचिव प्रियांका कुलकर्णी- छापवाले यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.
चंद्रपूरचे तत्कालीन आयुक्त राजेश मोहिते हे आरोग्याच्या कारणामुळे सुट्टीवर आहे, त्यांची पद स्थापना मंत्रालयात करण्यात आली आहे, चंद्रपूर मनपा आयुक्तांचा कार्यकाळ राजेश मोहिते यांचा चांगलाच वादग्रस्त राहिला. Cmc new commissioner vipin paliwal
अनेक घोटाळ्यात त्यांचे संबंध व नावाची जोरदार चर्चा राहिली, नुकतेच कार्यालयात गैरहजर असण्याच्या कारणावरून महापौर राखी कंचर्लावार यांनी आयुक्त मोहिते यांची नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली होती. Chandrapur municipal corporation
विपीन पालीवाल (मुद्दा) हे २३ जून २०२१ पासून चंद्रपूर मनपात अतिरिक्त आयुक्त या पदावर कार्यरत होते. त्यांनी आतापर्यंत कामठी, बल्लारपूर आणि वर्धा नगर परिषद येथे मुख्याधिकारी म्हणून काम केले आहे.