वर्धा - देवळी येथून वर्धेला येत असताना सेलसुरा जवळ भीषण अपघात झाला. वाहनावरून नियंत्रण सुटल्याने सेलसुरा जवळील नदीच्या पुलावरून खाली वाहन खाली कोसळलंय. जवळपास 40 फूट पुलावरून चारचाकी वाहन खाली पडल्याने भीषण अपघात झाला आहे.
Major accident in wardha
रात्रीच्या वेळी जंगली श्वापदं वाहनासमोर आल्यानं वाहन अनियंत्रित झालं आणि थेट ४० फुट खोल दरीत ही कार कोसळली. मृतांमध्ये तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांचा पूत्र अविष्कार रहांगडाले याचाही समावेश आहे. मृतांमध्ये निरज चव्हान (वय 22) रा. गोरखपुर (UP), अविष्कार विजय रहागडाले (वय 21 ) रा. गोंदिया , नितेशसिंग (वय 25 )/रा. राज्य ओडीसा, विवेक नंदन (वय 23 ) ), रा. गया बिहार आणि प्रत्युशसिंग हरेन्द्रसिंग (वय 23) रा. गोरखपुर (UP), शुभम जयस्वाल (वय 23) रा. दिनदयाल उपाध्याथ नगर UP, पवनशक्ती (वय 19) रा.गया बिहार अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. Bjp mla son died road accident
आमदार विजय रहांगडाले यांना तो एकुलता एक मुलगा होता. अविष्कारने दहावीपर्यंतचे शिक्षण गोंदियाच्या मनोहरभाई पटेल सैनिकी विद्यालयात घेतले होते. पदवीपर्यंतचे शिक्षणही जिल्ह्यातूनच झाले. सध्या तो वर्धा येथील दत्ता मेघे मेडिकल काॅलेजमध्ये एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाला शिकत होता. अविष्कारच्या मृत्यूची माहिती मिळताच संपूर्ण विधानसभा क्षेत्रात शोककळा पसरली आहे. दुपारी मृतदेह आणल्यानंतर स्वगावी खमारी येथील स्मशानभूमीत अविस्कारच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. Breaking accident