गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
गडचांदूर येथील शिवसेना कार्यालय येथे शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.स्व. बाळासाहेब ठाकरे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी गडचांदूर नगरपरिषद गटनेता तथा शिवसेना कोरपना तालुका प्रमुख सागर ठाकुरवार, नगरसेवक तथा उपतालुका प्रमुख सरवर भाई,महिला व बालकल्याण उपसभापती सौ.वैशाली गोरे, नगरसेविका सौ.किरण अहिरकर,नगरसेविका सौ.सुनीता कोडापे, तालुका समन्वयक इर्शाद कादरी, शिवसेना शहर प्रमुख अक्षय गोरे,युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रणित अहिरकर,रजत ठाकुरवार,यश ठाकुरवार, संदीप धनविजय,संजय हिवरे आदी शिवसैनिकांची प्रामुख्याने उपस्थिती होती.