चंद्रपुर- विकलांग सेवा संस्थेद्वारे विविध उपक्रम राबविले जात असून त्यात स्मृतीवृक्ष संगोपन ,जुनी कपडे संकलन व वितरण, संगणक प्रशिक्षण व अपंग सल्ला मार्गदर्शन तसेच शासनमान्य Shiv Bhojan केंद्राद्वारे नाममात्र दरात रोज 100 गरज वंताना उत्कृष्ट भोजन सुविधा नियमित पुरविण्यात येत असून देशाच्या ७३ व्या गणराज्य दिनाचे औचित्य साधून यावर्षी सर्व लाभार्थ्याना मिठाईचे वितरण करण्यात आले तसेच चांदा गड गढ फाऊंडेशनच्या युवा सदस्य ईशान नंदनवार, रुबिना शेख, कीर्ती येरणे सर्वाना जोडणारी सिया नागपुरे इत्यादींना संस्थेच्या वतीने ग्रंथ व पुष्पगुछ देऊन मान्यवरांच्या हस्ते विशेष कौतुक करण्यात आले.
यावेळी दीपा खंडाळे यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दहा भोजन थाळी ताठची भेट दिली.
या कार्यक्रमाला प्रियंका शिवरकर, सुभाष तेटवार, रंजना नाकतोडे, सीमा ठाकूर, सचिन राखोंडे, देवराव कोंडेकर, अशोक खाडे, प्रसाद पान्हेरकर, संगीता माहुरकर, संजय डाखोरे यांची विशेष उपस्थिती लाभली होती. याप्रसंगी पूर्वा मेडपल्लीवर यांनी ही आपल्या वाढदिवसाप्रीत्यर्थ रुचकर स्नेह भोजनाचा भार उचलला.
सर्व दान दाते व उपस्थितांचे संस्थाध्यक्षा वर्षा कोठेकर यांनी आभार मानलेत व गणराज्य दिवसाच्या व नववर्षाच्या शुभकामना दिल्या.

