गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
राष्ट्रसंत युवा मंडळ बिबी यांच्या वतीने व क्राईस्ट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,चंद्रपूर यांच्या सौजन्याने जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या बिबी,धामणगाव,नैतामगुडा व आसन(बु)अशा चार ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधी वितरण शिबिर नुकतेच पार पडले.सदर शिबिराचा एकूण 910 रुग्णांनी लाभ घेतला. Free medical Health camp ग्रामपंचायत बिबीचे माजी उपसरपंच आशिष देरकर यांच्या पुढाकारातून हे चारही शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 27 जानेवारीला बिबी व धामणगाव तर २८ जानेवारीला आसन(बु.)व नैतामगुडा येथे शिबीर पार पडले. त्यानुसार बिबी 490.धामणगाव 195. आसन (बु.), गेडामगुडा 110 व नैतामगुडा येथे 115 अशा एकूण 910 रुग्णांची तपासणी करून मोफत औषध पुरवठा करण्यात आला. सध्या ताप,सर्दी,खोकला या आरोग्यविषयक समस्यांनी गावागावात थैमान घातले असून या शिबिराचा गावकऱ्यांना चांगलाच लाभ झाला. शिबिरासाठी क्राईस्ट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, चंद्रपूर येथील डॉ.मिथून गोवर्धन,डॉ. मृण्मयी कोरेवार, आनंद डोंगरे,सुदेश शंभरकर, संध्या घुरले,चंदा चांदेकर, आकाश उमरे, हिमांशू कांबळे, जोसेफ कुरियन,पॉल पौलॉस आदींनी सहकार्य केले.
