गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
औद्योगिक नगरी म्हणून प्रसिद्ध कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरात एका रॅन्चोने स्वदेशी बनावटीची electric scooter साकारली आहे. राकेश नागेश पेटकर असे या युवकाचे नाव असून त्याचे हे संशोधन नवीन पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे. गडचांदूरकरांसाठी ही बाब अभिमानास्पद असून या अभिनव संशोधनासाठी कोरपना तालुका,राजूरा विधानसभा व गडचांदूर शहर भाजपाच्या वतीने राकेशचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.काहीतरी वेगळा व नवीन करण्याची जिद्द असलेला गडचांदूर शहराचा हा रॅन्चो चंद्रपूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील बॅच 2018 च्या मेकॅनिकल विद्या शाखेतील विद्यार्थी असून राकेशने भुवनेश्वर येथील स्काय रायडर इन्स्टिट्यूट येथून Automobile Designing and Manufacturing चा कोर्स केला आहे.त्याचे वडील नागेश पेटकर यांचे गडचांदूर येथे स्वत:चे मोटारसायकल दुरूस्तीचे गॅरेज आहे.
लॉकडाऊनच्या काळात राकेशने घरच्याच जुनी बजाज कंपनीच्या पेट्रोल स्कूटरचे इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये रपांतर केले आहे. याची विशेषतः म्हणजे ही स्कूटर अवघ्या 30 रूपयांच्या 4 युनिटमध्ये 65 किलोमीटर प्रतितास गतीने 100 किलोमीटर अंतर पार करते. बाजारातील अनेक चायनीज बनावटीच्या मोटारसायकलला ही स्वदेशी इलेक्ट्रिक स्कूटर उत्तम पर्याय ठरत आहे.इंधनाचे वाढलेले दर आणि pollution प्रदुषणाची समस्या लक्षात घेता ही स्कूटर पर्यावरणपूरक म्हणून प्रत्येकांना आकृष्ट करीत आहे. यासोबतच राकेश आता electric bullet इलेक्ट्रिक बुलेट व अपंग व्यक्तींसाठी स्वयंचलित तीनचाकी सायकलवर काम सुरू करणार असल्याची माहिती असून लवकरच तो हा आविष्कार जगापुढे आणणार आहे.सध्या या आविष्काराचे सर्वत्र कौतूक होत असून राकेशचा उत्साह वाढविण्यासाठी गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष सतीश उपलेंचीवार,माजी नगरसेवक नीलेश ताजने, महामंत्री हरीश घोरे,जेष्ठ नेते शिवाजी सेलोकर, संदीप शेतकी,युवानेते कुणाल पारखी,सुयोग कोंगरे, महेश घरोटे,प्रशांत गौरशेट्टीवार,भास्कर उरकुंडे इतर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राकेशचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहे.
