गोंडपीपरी:– तालुक्यातील करंजी येथे आज दि.29 जानेवारी रोज शनिवारला सांयकाळी 5 वाजताच्या दरम्यान दुचाकीने बॅरिकेटस ला जोरदार धडक दिल्याने दुचाकी वाहन वरील माजी सरपंचाचा जागीच मृत्यू तर 1 जखमी झाला आहे.
म्रुतकाचे नाव रविंद्र उर्फ रवी खाडे वय 57 वर्ष रा.कोठारी याचा मृत्यू झाला असून संदीप उर्फ बालु लोनगाडगे रा,कोठारी वय 39 वर्ष हा जखमी झाला आहे. Accident
मृतक रवींद्र खाडे हा कोठारी ग्रामपंचायत ला माजी सरपंच होता.
जखमी संदीप यांच्या हातात दुखापत झाली आहे.
ते दोघे दुचाकी वाहनाने गोंडपीपरी येथून कोठारीला जात होते. दुचाकीस्वार खाडे तर संदीप मागे बसून होता. Ex-sarpanch die
करंजी येथे लावलेल्या बॅरिकेट ला दुचाकीने जोराची धडक दिल्याने ते दोघे ही कोसळले.
घटनेची माहिती मिळताच gondpipari गोंडपीपरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार जीवन राजगुरु हे घटनास्थळी हजर झाले.
पुढील तपास गोंडपीपरी पोलिस करीत आहेत.
