चंद्रपूर - गेल्या दहा वर्षा पासून सुब्बई चिंचोली येथील जमीनी वेकोली ने अधिग्रहन करून मात्र शेतकऱ्यांच्या जमीनवर आज पर्यत शेतकऱ्यांना आपला हक्क व मोबदला मिळलाच नाही मात्र स्वताच्या हक्कासाठी व मोबदला मिळण्यासाठी आजही शेतकऱ्यांचा संघर्ष सुरूच आहे. या भोळ्या भाबड्या गरीब शेतकऱ्यांचे जमीनी एका चंद्रपुर जिल्यातील माजी गृहमंत्री हंसराज अहीर यांनी निवडणूकीचे स्वार्थ साधुन खोट्या जाहिराती पत्रिका छापून या सुबई चिंचोली येथील संपूर्ण शेतकऱ्यांना नोकरी व जमीनाचा आर्थिक मोबदला मिळाला असे खोटे आश्वासन दिले, याच्या जाहिराती केल्या मात्र एकाही सुबई चिंचोली येथील शेतकऱ्यांना नोकरी व जमीनाचा मोबदला मिळाला नाही आणि कोणत्याही प्रकारचा फायदा सुद्धा या शेतकऱ्यांचा झाला नाही उलट या भोळ्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान व मानसीक संतुलन बिगडविले. आज या सुबई चिंचोली येथील शेतकऱ्यांचे चंद्रपूर जिल्ह्य़ातील माजी गृहमंत्री यांनी शेतकर्यांच्या भावनेशी खेळून त्यांची मने दुखावली गेली असे आरोप सुबई चिंचोली येथील शेतकर्यांनी केला, अश्या मंत्र्यांवर व यांच्या भागीदारी असलेले सर्व वेकोली प्रशासनावर गुन्हा दाखल झाला पाहिजे व तसा गुन्हा आम्ही सर्व शेतकरी दाखल करू. तसेच वेकोलीने शेतजमिनीवर गेल्या दहा वर्षांपासून अधिग्रहन केल्यामुळे जमीनीवर Farmer शेतकरी आज सरकारी योजने पासून वंचित राहावे लागत आहे, तसेच सरकारी योजनेतून शेतात येणारे शेतकालवे प्रकल्प सुद्धा वेकोली जमीन अधिग्रहनामुळे शेतकऱ्यांना त्या शेतकालवे प्रकल्पाचा फायद्या पासूनसुद्धा वंचित राहावे लागले व ते कालवे त्या जमिनीतून वगळविण्यात आले, असे अनेक नुकसान आज शेतकऱ्यांना या गैरजिम्मेदार चंद्रपूर जिल्ह्य़ातील माजी गृहराज्यमंत्र्यामुळे भोगावे लागत आहेत. अशी माहीती मिळताच शेतकऱ्यांने सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव चंद्रपूर जिल्हा महासचिव बिआरएसपी यांच्याकडे धाव घेतली व यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा-जेव्हा आंदोलनाची उभारनी केली तेव्हा काही गुपीत असलेली बाबींची वाचा फुटु लागली त्या करीता वेळो-वेळी आंदोलने करण्यात आली. Wcl Cmd
आंदोलना दरम्यान वेकोली सीएमडी ला सुद्धा धारेवर धरण्यात आले, सुबई चिंचोली कोळसा खाणी प्रकल्प उभारण्यासाठी आपण जी जनसुनावणी केली त्या जनसुनावणी प्रमाणे आपण वागत नाही तेव्हा वेकोली प्रशासनाची बंद मुखे उघडली मात्र सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी निश्चित लाऊन धरलेली मागणी की जेव्हा तुम्ही शेतकऱ्यांना त्याचा हक्क म्हणून नोकरी, आर्थिक मोबदला व झालेली नुकसान भरपाई जी जनसुनावणीत केलीत तो वादा तुम्ही पुर्ण करावा, यासाठी नागपूर येथे बिआरएसपी च्या माध्यमातून सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना घेऊन बेमुदत धरणे आंदोलन उभारणी केली. या आंदोलन दरम्यान वेकोली ने पाईकराव व प्रकल्पगस्त शेतकऱ्यांना सोबत घेत वेकोली सीएमडी सोबत मिटिंग द्वारे चर्चा सुरू केली, चर्चेतून शेतकऱ्यांचे नेतृत्व करणारे सुरेशभाऊ पाईकराव यांनी वारंवार एकच मागणी लाऊन धरली ती म्हणजे नोकरी, आर्थिक मोबदला व झालेली नुकसान भरपाई द्यावी मात्र वेकोली ने आर्थिक मोबदला व नोकरी देणार नाही असे सांगितले. यावर पाईकराव यांनी विरोध करून सांगितले की जोपर्यंत शेतकऱ्यांना आपला न्यायरूपी नोकरी, आर्थिक मोबदला व झालेली नुकसान भरपाई देणार नाही तोपर्यंत शेतकरी आंदोलन सोडणार नाही किंवा वेळ पडल्यास या आंदोलनातून तिव्र भुमिका सुद्धा घेऊ तेव्हा वेकोली ने फक्त तुमचा आथिर्क मोबदला देऊ मात्र नोकरी मीळणार नाही असे सांगितले असे वेकोलीच्या नकारात्मक भूमिकेमुळे या आंदोलनातून शेतकऱ्यांने अन्नत्याग आमरण उपोषण सुरू करण्यात आले. शेतकऱ्यांना नोकरी का नाही शेतकरी शेतीहीन होऊन आपल्या परिवाराचे पालन पोषण कसा करणार वेकोली जोर जबरदस्ती करीत या शेतकऱ्यांची जमीन घेत आहे, जिल्हा महासचिव सुरेशभाऊ पाईकराव शेतकर्यांची बाजु मांडत शेतकर्यांना न्याय मिळाला पाहिजे व जे या प्रकल्पात शेतकऱ्यां सोबत छळ करत आहे असा वेकोली अधिकार्यांवर व माजी गृहराज्यमंत्री चंद्रपूर यांच्यावर सक्त कारवाई करुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा फक्त वाट शेतकऱ्यांना त्यांचा न्यायच्या प्रतिक्षेची आहे. जोपर्यंत आम्हाला आपला हक्क नोकरी, आर्थिक मोबदला व झालेली नुकसान भरपाई देणार नाही तोपर्यंत आम्ही शेतकरी हे बेमुदत धरणे आंदोलन व आमरण उपोषण अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवु सुरेशभाऊ पाईकराव जिल्हा महासचिव BRSP अरुण सोमलकर, मारोती नेव्हारे, संजय चौधरी, मनोज कुरवटकर समस्त प्रकल्पग्रस्त शेतकरी यांनी सांगितले.
