चंद्रपूर - प्रामाणिक जनावरांचे नाव घेतले की पाळीव श्वान म्हणजेच कुत्रं, हा सदस्य कुटुंबाचा एक भाग म्हणून सोबत असतो, कुटुंबातील त्या सदस्यासाठी एकाने 8 वर्षे न्यायालयीन लढाई लढत आपल्या जवळच्या श्वानाला न्याय दिला.
एका अपघातात उमेश भटकर यांच्या कुत्र्याचा मृत्यू झाला होता, त्याला न्याय देण्यासाठी उमेश 8 वर्षे कायदेशीर लढाई लढला व अखेर त्याला न्याय दिला, ही घटना चंद्रपूर शहरातील तुकूम भागातील आहे.
The battle of justice
चंद्रपूर शहरानजीक असलेल्या तुकुम येथील रहिवासी उमेश भटकर १० जानेवारी २०१३ ला सकाळी ६.३० वाजता आपल्या ११ महिन्यांच्या लाडक्या कुत्र्याला अय्यप्पा मंदिराजवळ फिरवत होते. तेवढ्यात भरधाव असलेल्या स्कूल बसने गोपाल दूध डेअरीच्या जवळ जॉनला धडक दिली. यामध्ये जॉनचा मृत्यू झाला. मेसर्स रहीम ट्रॅव्हल्सच्या बस क्रमांक एम एच ४० एन ३७६६ ने हा अपघात झाला होता. यानंतर भटकर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. जॉनचे शवविच्छेदनही करण्यात आले. शवविच्छेदन अहवालानुसार अपघातात जॉनचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. दोषी असलेल्या ट्रॅव्हल्स कंपनीच्या विरोधात भटकर यांनी दीर्घ न्यायालयीन लढाई लढली आणि अखेर न्यायालयाने भरपाई देण्याचा आदेश दिला.
जॉनचा मृत्यू झाल्यानंतर अपघात दावा देण्याचा आदेश मोटर ॲक्सिडेंट क्लेम्स ट्रिब्यूनल चंद्रपूर ने दिला आहे. जॉन नामक कुत्रा आरती इन्फ्रा कंपनीमध्ये नोकरी करीत होता. मालक भटकर यांना त्याचे ८००० रुपये प्रतिमहिना वेतन मिळत होते. स्कूल बस चालकाच्या बेपरवाहीमुळे जॉनचा मृत्यू झाला. परिणामी भटकर यांचे दर महिन्याला ८००० रुपयांचे नुकसान होत होते. भटकर यांनी बसचे मालक आणि इन्शुरन्स कंपनीकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. त्याचा पाठपुरावाही केला पण काही उपयोग झाला नाही. अखेर त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि न्याय मिळविला. Justice given to the dog
ॲड. जयप्रकाश पांडेय यांच्या माध्यमातून मोटर ॲक्सिडेंट क्लेम्स ट्रिब्यूनल चंद्रपूरमध्ये प्रकरण दाखल केले. यामध्ये बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, रहीम ट्रॅव्हल्स बस कंपनी आणि बसचालक सुधाकर थेरे या तिघांना दोषी धरले होते. भटकर यांनी ५ लाख रुपये भरपाई मिळावी, अशी मागणी केली होती. हे प्रकरण न्यायालयात तब्बल ८ वर्ष चालले. अखेर उमेश भटकर यांच्या बाजूने निकाल देण्यात आला. १, ६२,००० रुपये आणि त्यावर ८ टक्के दराने व्याज भटकर यांना द्यावे, असे आदेशात नमूद करण्यात आले. भटकर यांच्या बाजूने जयप्रकाश पांडेय यांनी तर इन्शुरन्स कंपनीच्यावतीने ॲड. अभय कुल्लुरवार आणि बस मालकाच्या वतीने ॲड. एन.एस. सूर यांनी बाजू मांडली.For the first time in history
