प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - जन्म देणे जेवढे सोपे आहे तेवढेच पालन पोषण संगोपन करुन त्यांना मोठे करणे एवढेच नव्हेतर तीला शिक्षण देऊन तिचा विवाह करुन देऊन कन्यादानाच पुण्य पदरी घेऊन पूर्ण सोपस्कार पार पाडणे यासारखे जगात कुठलेच कार्य मोठे असू शकत नाही. हे कार्य ज्यांच्या हातून घडले त्या चंद्रपूर जिल्हा नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास या राष्ट्रीय संस्थेच्या जिल्हा संघटिका आणि आश्रम शाळेच्या सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती कविता दशरथ मोहूर्ले यांनी एका गरीब निराधार असलेल्या कु.लक्ष्मी मेश्राम नामक मुलीला लहानपणापासून आपल्याच घरी ठेऊन तिचे पालन पोषण करुन तिला आवश्यक तेवढे शिक्षण देऊन तिचा विवाह जोडून तिचे कन्यादान सारखे सोपस्कर पूर्ण पार पाडण्यापर्यंत एक मदतीचा पुढे केला. यासारखे दुसरे पुण्यकार्य असूच शकत नाही. ideal wedding ceremony
हे श्रीमती कविता मोहुर्ले यांचे प्रति मुल वासीयांनी प्रत्यक्ष अनुभवले आहे. गरीब लक्ष्मी नामक मुलगी श्रीमती कविता मोहूर्ले यांचे कडे बरेच वर्षांपासून राहत होती (आई एकटी असल्याने). तिच्या शिक्षणाची आणि राहण्याची सोय मोहुर्ले यांनी केली. लग्न जमल्या पासुनच खर्चाची जवाबदारी देखील मोहुर्ले यांनीच स्विकारली. जवळपास बराच लग्नकार्याचा खर्च मोहुर्ले मॅडम यांनी उचलला. लग्न कार्य वरपक्षाकडे म्हणजे मुलाकडे असल्याने हळदीच्या कार्यक्रमात लक्ष्मीच्या संसाराला अत्यावश्यक सर्व साहित्य लक्ष्मीला देतांना कविता मोहुर्ले मॅडम यांना डोळे भरुन आले आणि अश्रु अनावर झाले. याप्रसंगी भेटवस्तु आणि फणसाचे रोप भेट देऊन नेफडोच्या पदाधिकारी यांनी लक्ष्मीला भावी आयुष्यासाठी सर्वांनी आशीर्वाद रुपी शुभेच्छा दिल्या व कर्त्या-करवित्या कविता मोहुर्ले मॅडम यांचे कौतुक केले. आणि संस्थेच्या वतीने खूप खूप अभिनंदन केले.
यावेळी नागपूर विभाग उपाध्यक्षा तेजस्विनी नागोसे मॅडम, नागपूर विभाग सचिव रत्ना चौधरी मॅडम, चंद्रपूर जिल्हा अध्यक्षा ललिता मुस्कावार मॅडम, जिल्हा संघटिका कविता मोहुर्ले मॅडम,जिल्हा संघटक श्रीरंग नागोसे, गुरुदास चौधरी, तालुका संघटक तथा सल्लागार गुरु गुरनुले, तालुका संघटिका सौ. माधुरी गुरनुले व संस्थेचे पदाधिकारी संघटक यांचेसह लक्ष्मी मुलीचे नातलग आणि वार्डातील शेजारी महिला पुरुष उपस्थित राहून आशीर्वाद रुपी वैवाहिक जीवनासाठी आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्या दिल्या. हा अमूल्य सोहळा प्रत्यक्ष बघतांना उपस्थितांचेही डोळे पाणावले हे मात्र खरे.
