चंद्रपूर - रविवार 19 डिसेंम्बरला बाबूपेठ येथील डी.एड कॉलेज जवळील चंद्रपूर बल्लारपूर रेल्वे उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघाताच्या घटनेने चंद्रपूर हादरून गेले. या घटनेत एका युवकाचा मृत्यू झाला असून 1 गंभीर तर दोघे किरकोळ जखमी आहे.
रविवारचा दिवस असल्याने चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर वाहतुकीची गजबज नव्हती, मात्र सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास चारचाकी वाहन क्रमांक MH34BR0141 हे भरधाव वेगात बाबूपेठ येथील रेल्वे उड्डाणपुलावरून जात होते, 100 ते 120 किलोमीटर प्रति तासाच्या वेगात असलेलं वाहन पुलावरील वळणावर अनियंत्रित झालं आणि पुलाची रेलिंग तोडून तब्बल 30 ते 40 फुटावरून डी.एड कॉलेज परिसरात असलेले बँक ऑफ इंडियाच्या प्रशिक्षण केंद्राच्या बाजूला कोसळले. terrible accident
अचानक घडलेल्या या घटनेने डी. एड कॉलेजवरील मैदानावर खेळत असलेल्या युवकांनी हे चित्र बघितलं आणि त्या चारचाकी वाहनाकडे धाव घेतली.
क्षणाचाही विलंब न करता जखमी युवकांना वाहनांच्या बाहेर काढले व अंबुलन्स ला बोलावीत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले मात्र यावेळी अभिषेक गुप्ता नामक युवकाचा मृत्यू झाला तर उर्वरित मोहन रेड्डी, रोहित नागलवार, चिंटू तोगरवार हे जखमी असून दोघांवर खाजगी तर एकावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे, एकाची परिस्थिती नाजूक असल्याचे सांगितले जाते. Driving under the influence of alcohol
अपघाताच्या वेळी युवक हे दारू पिऊन होते, जेव्हा या युवकांना बाहेर काढण्यात आले त्यावेळी त्यांच्या हातात दारूच्या बॉटल्स आढळून आल्या असे प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले.
दारूच्या नशेत मद्यधुंद असलेल्या युवकांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. वेग आणि मस्तीच्या नादात एका युवकाला आपला जीव गमवावा लागला.
चारही युवक हे बल्लारपूर येथील रहिवासी होते.
