चंद्रपूर - राज्यातील 105 नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार तोफा आज 20 डिसेंम्बरला थंडावणार असून 21 डिसेंम्बरला मतदान होणार आहे. जास्तीत जास्त नगरपंचायत आपण जिंकाव्या यासाठी कांग्रेस, भाजप, राष्ट्रवादी व शिवसेनेने कंबर कसली आहे.
भाजप, कांग्रेस व राष्ट्रवादी ने आपल्या बड्या नेत्यांना निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरविले आहे.
मात्र मातब्बर राजकारण्यांच्या मध्ये शिवसेनेचा नवखा जिल्हाप्रमुख उभा ठाकल्याने मोठ्या नेत्यांना तो युवक कडवे आवाहन उभे करीत आहे. Shivsena chandrapur
तो युवक म्हणजे कार्यकर्ता ते शिवसेना जिल्हाप्रमुखाचा प्रवास करणारा संदीप गिर्हे.
संदीप गिर्हे चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपीपरी, कोरपना, पोम्भूर्णा व जिवती नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहे. Nagar panchayat election
आज भाजप पक्षात राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, कांग्रेस पक्षाकडे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर व राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाजवळ मोठ्या नेत्यांची फौजचं या निवडणुकीत उतरवली आहे.
मात्र शिवसेनेने आपल्या तळागळाच्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवत सर्व जबाबदारी जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या खांद्यावर टाकली आहे.
गिर्हे हे दिवस रात्र चारही नगरपंचायत क्षेत्रात आपल्या प्रचाराची जबाबदारी मेहनतीने सांभाळत शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहचून आपल्या पक्षातील जबाबदार नेतृत्वाची माहिती देत आहे.
कॉर्नर सभा ते पदयात्रा असे दैनंदिन प्रचार कार्य शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रशांत कदम यांच्यासोबत गिर्हे पार पाडत आहे.
याआधी सुद्धा संदीप गिर्हे यांनी गडचांदूर क्षेत्रात शिवसेनेला नवसंजीवनी देत नगरसेवकांना निवडून आणले होते.
आता त्या प्रचाराचा अनुभव सोबत घेत संदीप गिर्हे नगरपंचायत निवडणुकीत उतरले आहे.
कुणाच्या सभेला किती गर्दी याची तमा न बाळगता संदीप गिर्हे पूर्ण ताकदीनिशी उमेदवारांचा प्रचार करीत आहे, निवडणूक कुणीही जिंको मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीत चर्चा शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांचीच सुरू आहे.
