चंद्रपूर - दारूच्या नशेत धुंद युवकांचे चारचाकी वाहन बाबूपेठ - बल्लारपूर रेल्वे उड्डाणपूलाच्या खाली वाहन कोसळले. Huge accident
अपघात इतका भीषण होता की 4 पैकी 1 युवक जागीच मरण पावला, चारचाकी वाहन कोसळताच बाबूपेठ येथील युवकांनी जखमी युवकांना गाडीबाहेर काढत रुग्णालयात हलविले मात्र त्यातील एक युवक दगावला.
चारही युवक बल्लारपूर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. युवक हे चंद्रपूर वरून बल्लारपूर च्या दिशेने जात होते.
युवक मद्य प्राशन करून गाडी चालवीत असल्याचा अंदाज असून वाहन हे भरधाव वेगात चालवीत होते, वाहनवरील नियंत्रण सुटल्याने पुलाच्या वळणावरील रेलिंग तोडून वाहन खाली कोसळले.
Babupeth Railway Overbrigde
एका मृतकाचे नाव अभिषेक गुप्ता तर दुसऱ्या युवकांचे नाव अजून कळले नाही.
चारचाकी वाहन बल्लारपूर येथील टोगरवार यांचे असून वाहन क्रमांक Mh 34br 0141 आहे.
वाहन पडल्यावर एक युवक हातात दारूची बॉटल घेऊन निघाला असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
उड्डाणपुलावरील वळणावर वाहन भरधाव वेगात असल्याने युवकांचे वाहनवरील नियंत्रण सुटले आणि वाहन पुलाखाली कोसळले.

