गडचांदूर :- गडचांदूर येथील बंगाली कॅम्प परिसरात काही दिवसांपासून Manikgad cement company माणिकगड सिमेंट कंपनीचे सोलर प्लांटचे काम सुरू आहे. 26 नोव्हेंबर रोजी काही अज्ञात चोरट्यांनी तेथील 7 सोलर प्लेट्स चोरून नेले. यासंदर्भात प्राप्त तक्रारीनंतर गडचांदूर पोलीसांनी कलम 380 नुसार गुन्ह्याची नोंद केली.ठाणेदार सत्यजीत आमले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी प्रमोद शिंदे, सह फौजदार सुनील बोरीकर,पोशी संदीप थेरे यांनी कसोशीने तपास करून बंगाली कॅम्प गडचांदूर येथील एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून अंदाजे 20 हजार रूपये किंमतीचे 3 Solar Plates सोलर प्लेट्स जप्त केले आहे.उर्वरित प्लेट्स व इतर दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे.