चंद्रपूर - जिल्ह्यात व जिल्हामार्गे आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्यात जाणाऱ्या गो तस्करांवर वर्ष 2021 मध्ये एकूण 50 कारवाया, 115 आरोपीविरुद्ध गुन्हे व 823 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यास पोलीस प्रशासनाला यश मिळाले आहे. Chandrapur police
सदरील कारवाई जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आली.
ज्यामध्ये चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने रामनगर हद्दीत 35 गोवंशीय जनावरांची सुटका करीत तब्बल 23 लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. Beef smuggler
दुसऱ्या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने पडोली क्षेत्रात 11 जनावरांची सुटका करीत 13 लाख 15 हजारांचा मुद्देमाल, गडचांदूर पोलीस स्टेशन हद्दीत 7 गोवंशीय जनावरे 4 लाख 20 हजारांचा मुद्देमाल, नागभीड येथे 5 गोवंशीय जनावरे, 5 लाख 45 हजारांचा मुद्देमाल, विरुर पोलीस स्टेशन हद्दीत 3 जनावरे, 1 लाख 50 हजारांचा मुद्देमाल, नागभीड पोलीस स्टेशन हद्द 4 जनावरे, 4 लाख 10 हजारांचा मुद्देमाल पुन्हा नागभीड पोलीस स्टेशन हद्दीत 11 गोवंशीय जनावरे 21 लाख 65 हजारांचा मुद्देमाल, विरुर पोलीस स्टेशन हद्द 23 जनावरे व 16 लाख 98 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गोवंशीय जनावरांना चारचाकी वाहनात निर्दयपणे कोंबून त्यांना कत्तलीकरीता नेण्याचे काम सुरू असून त्यावर निर्बंध घालावा यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
