प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये लहान पणापासूनच सुप्तगुण अवगत असतात परंतु सुप्तगुनांचा विकास मात्र अशा विविध क्रीडा व कौशल्य स्पर्धामध्ये सहभाग घेऊनच विद्यार्थ्यांना आपला व्यक्तिमत्व विकास करावा लागतो असे अमूल्य मार्गदर्शन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि युवाशक्ती व्यायाम मंडळाचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी कराटे स्पर्धेत सहभागी झालेल्या विदयार्थ्यांना केले. मुल येथील क्रीडा संकुल येथे आयोजित केलेल्या Vidarbha Karate League-2021 विदर्भ कराटे लीग-२०२१ विदर्भ स्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धेचे उदघाटन करतांना बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष,बाजार समिती संचालक तथा माजी नगर परिषद उपाध्यक्ष राकेश रत्नावार, तर प्रमुख अतिथीं कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तथा कांग्रेस कमिटी अध्यक्ष घनश्याम येनुरकर, उपसभापती संदीप कारमवार, संचालक राजेंद्र कन्नमवार, सरपंच संघटनेचे अध्यक्ष संचालक अखिल गांगरेड्डीवार,महिला कांग्रेस अध्यक्ष रुपाली संतोषवार, आदी मान्यवर उपस्थित होते. विदर्भ स्तरीय स्पर्धा आयोजनासाठी तालुका Karate Association कराटे असोसिएशन मुल व सह कराटे अँड फिटनेस क्लब मुलच्या सर्व सहभागी पदाधिकारी आणि सदश व त्यांचे प्रशिक्षक शिक्षक यांचे देखील विशेष सहकार्य असल्याचे आयोजकांनी सांगितले.
