प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर/गडचिरोली - आपल्या कर्तुत्वाने केवळ देशातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध असणारे पद्मश्री प्रकाश आमटे यांनी हेमलकसा येथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या शाळेला फ्रेंड चारीटी ग्रुप च्या वतीने ५०० गणवेशाचे वितरण करण्यात आले.
Friends Charity group
फ्रेंड चारिटी ग्रुप च्या माध्यमातून कायम जनहिताचे कार्य होत आले आहे. फ्रेंड चारीटी ग्रुपच्या प्रोजेक्ट डायरेक्टर सरिता मालू यांच्या संकल्पनेतून व रमेश जैन,अनिल लूनिया यांच्या सहकार्यातून हेमलकसा येथील विद्यार्थ्यांना ५०० uniforms गणवेशाचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी हेमलकसा येथे Prakash Amte पद्मश्री प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे, सरिता मालू, पूजा नीचाल, प्रिया चंदेल, साधना चेडे, कृष्णा यांची उपस्थिती होती
