प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णाला उपचारासाठी धावून मदत करणारी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव सहकारी बँक म्हणून ओळख झालेल्या CDCC बँकेने केवळ शेतकर्यांच्या कुटुंबियांचे हित जोपासण्याचे पुण्य कार्य CDCC बँकेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली तेंव्हा पासूनच शेतकऱ्यांच्या कल्याणार्थ बँकेला झालेल्या नफ्यातुन शेतकरी कल्याण निधी वळती करून दुर्धर आजाराच्या उपचारासाठी उपयोगात आणत असून तीन वर्षाची बालिका कु. आराध्या मनोज कोतपल्लीवर हिच्या Blindness of the eye डोळ्याला अंधत्व असल्याने डोळ्याच्या शस्त्र क्रियेसाठी तिला आर्थिक मदतीची गरज लक्ष्यात घेऊन बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी वीस हजार रुपये (२०,०००) चेक द्वारे रुग्ण मुलगी कु.आराध्य व तिची आई हिला तात्काळ मदत दिली. अशी जीवनावश्यक कल्याणकारी मदत देतांना संतोषसिंह रावत यांचेसह संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, तालुका महिला कांग्रेस अध्यक्ष रुपाली संतोषवार, डाँ. विलास सुरमवार, कांग्रेसच्या जेष्ठ महिला पदाधिकारी श्रीमती विमलताइ धारने, सविता सुरमवार, शालू कोतपल्लीवर, सिंधुताई सोनूलवार, प्रणाली रुखमोडे, प्रशांत पुण्यपवार, मंदाताई सोनूलवार, कविता सावसाकडे,शारदा दांडेकर, विनोद धारने, सुभाष संतोषवार, वडील मनोज कोतपल्लीवार, आई शुभांगी कोतपल्लीवार, यांचेसह वार्डातील नागरिक उपस्थित होते. लहान मुलीला दृष्टी देण्याच्या पुण्यकार्याला आर्थिक मदत दिल्याबद्दल अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे आभार मानले आहे.
