वरोरा - वरोरा येथील स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणावर खासदार बाळू धानोरकर यांच्या मार्गदर्शनात जय हिंद मंडळा तर्फे ४ डिसेंबर ते ५ डिसेंबर ला आमदार चषक भव्य खुले कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले. आमदार चषक कबड्डी सामन्यांची सुरुवात बाळू धानोरकर आमदार असताना झाली असून कोरोना काळात मात्र हे सामने स्थगित करण्यात आले होते.
4 डिसेंम्बरला कबड्डी सामन्याचे उदघाटन करण्यात आले, मात्र सदर कार्यक्रमात कोरोना नियमांना अक्षरशः पायदळी तुडविण्यात आले, राज्यात नव्या व्हेरियंट चा धोका बघता नागरिकांसाठी नियमावली सुद्धा जारी करण्यात आली असे असताना सुद्धा आमदार धानोरकर यांनी कबड्डी स्पर्धेचं आयोजन केले, सदर कार्यक्रमात कोरोना नियमांना डावलण्यात आले, कबड्डी च्या पहिल्या सामन्यात रात्री 9 वाजेदरम्यान नागरिकांची तुडुंब गर्दी होती, मात्र त्यावेळी अचानक प्रेक्षक गॅलरी कोसळली. Kabbadi league
अचानक घडलेल्या या घटनेत चेंगराचेंगरी सुरू झाली, मात्र या चेंगराचेंगरी मध्ये कुणालाही दुखापत झाली नाही. Audiences gallery collapse
सदर घटनेत 20 च्या वर नागरिक जखमी झाले असून यामध्ये अल्पवयीन बालकांचा सुद्धा समावेश असून 7 जण गंभीर जखमी आहे.
यामधील काही जखमींना पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोरोनाचा धोका बघता नगरपरिषद प्रशासनाने कोरोना नियम तुडविल्या प्रकरणी आयोजकांवर कारवाई करायला हवी होती.
