कोरपना :- ओमिक्रॉन व्हेरियंटचा संभाव्य धोका लक्षात घेता या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नवीन नियमावली जारी केली आहे. यात संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता,कोविड अनुरुप वर्तन,कार्यक्रमावरील निर्बंध,कोविड अनुरूप वर्तन विषयक नियम व दंड अशाप्रकारे सविस्तर माहिती देण्यात आली आहे. Omicron variant
हे जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात 29 नोव्हेंबर 2021पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहील असे अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी त्यांच्या आदेशात नमूद केले असून जिल्ह्यात याची ठिकठिकाणी अंमलबजावणी सुध्दा सुरू झाल्याचे चित्र आहे.असे असताना गडचांदूर शहरात मात्र याचा अजूनही काहीच परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. Corona guidelines
कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेचा पार्श्वभूमीवर शासनस्तरावर यंत्रणा सतर्क झाल्याचे दिसत असतानाच येथील संबंधित विभाग सध्या सायलेंट मोडवर असल्याचे अनुभवास येत आहे.एकीकडे शासनप्रशासन मास्क लावा,सोशल डिस्टंसिंग ठेवा व इतर कोरोना संबंधीचे आवाहन करीत आहे तर दुसरीकडे येथील कित्येक नागरिक विना मास्क बेफिकीरीने शहरात वावरताना दिसत आहे. कित्येक लहानमोठ्या दुकानदारांनी कोरोना नियमांना धाब्यावर बसवल्याचे चित्र असून काही अपवाद वगळता बऱ्याच ठिकाणी मास्क व सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडताना दिसत आहे. अशा परिस्थितीत कोरोना पसरण्याची शक्यता बळावली असून आदेशाप्रमाणे शहरातील लहानमोठ्या दुकानदारांच्या लसीकरणाची चौकशी करावी, Rtpcr Test आरटीपिसीआर तपासणी करावी,मास्क लावणे अनिवार्य असताना शहरात विना मास्क बेफिकीरीने फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.आता संबंधित विभाग याला किती गंभीरतेने घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
